Sunil gavaskar: गावस्करांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली, तर विराट कोहलीचं काय होणार?

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) प्रत्येक क्रिकेट सामन्याचं विश्लेषण करताना परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात.

Sunil gavaskar: गावस्करांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, तर विराट कोहलीचं काय होणार?
सुनिल गावस्कर
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 1:42 PM

मुंबई: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) प्रत्येक क्रिकेट सामन्याचं विश्लेषण करताना परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. ऋषभ पंत असो किंवा विराट कोहली (Virat kohli) खेळाडुंवर टीका करताना ते अजिबात कचरत नाहीत. सुनील गावस्कर खेळाडूंवर जशी टीका करतात तसंच त्यांच कौतुकही करतात. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर गावस्करांनी सूर्यकुमार यादवचं (Suryakumar yadav) तोंडभरुन कौतुक केलं आहे. काही महिन्यांनी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत संघात निवडीसाठी सूर्यकुमार यादव प्रबळ दावेदार असल्याचं गावस्करांनी म्हटलं आहे. भारताने नुकतीच संपलेली वेस्ट इंडिज विरुद्धची टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली, या मालिका विजयात सूर्यकुमार यादवचे महत्त्वाचे योगदान आहे.

तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार 31 चेंडूत तुफानी 65 धावांची खेळी केली. यामध्ये एक चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेत भारताकडून त्याने 194.54 च्या सरासरीने सर्वाधिक 107 धावा केल्या. त्याला मालिकावीरांच्या पुरस्कारनेही गौरवण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी संघात आला आहे

“यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमारचा समावेश केला पाहिजे. पहिल्या सामन्यात भारताचा डाव अडचणीत सापडलेला असताना त्याने आणि वेंकटेश अय्यरने भारताला विजय मिळवून दिला. आजही चार विकेट गेलेल्या असताना सूर्यकुमार-वेंकटेशने चांगला खेळ दाखवला. संघ योग्य दिशेने प्रगती करत आहे”, असे गावस्कर स्टार स्पोटर्सवर बोलताना म्हणाले.

“अचूकता अशक्य आहे. अपेक्षित गोष्टी घडत नसताना जबाबदारी घेऊन खेळणारे खेळाडू तुमच्याकडे आहेत. सूर्यकुमार अजनूही नवीनच आहे, हे विसरु नका. तो बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय असं नाहीय. वेंकटेश सुद्धा काही महिन्यांपूर्वी संघात आला आहे” असं गावस्कर म्हणाले.

गावस्करांच मत विराटला कदाचित आवडणार नाही सूर्यकुमार यादव डावाला आकार देऊ शकतो व तो फिनिशर आहे. सूर्यकुमार भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो असं मत गावस्करांनी व्यक्त केलं. गावस्करांच हे मत माजी कर्णधार विराट कोहलीला कदाचित आवडणार नाही. कारण तो सध्या भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. पण त्याआधी तो फ्लॉप होता. विराट कोहलीच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर सूर्यकुमार यादवचा पर्याय तिसऱ्या स्थानासाठी उपलब्ध आहे.

sunil gavaskar said suryakumar yadav perfect batsman for no 3 in team india virat kohli plays currently no this number

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....