Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघात निवड न झाल्यामुळे निराश झालेल्या सूर्यकुमारला सचिन तेंडुलकरच्या खास मेसेजमुळे प्रोत्साहन

सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही सूर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड झालेली नाही.

भारतीय संघात निवड न झाल्यामुळे निराश झालेल्या सूर्यकुमारला सचिन तेंडुलकरच्या खास मेसेजमुळे प्रोत्साहन
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 8:57 AM

मुंबई : मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव (Mumabi Indians Suryakumar Yadav) याने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) धडाकेबाज कामगिरी केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) सूर्यकुमारची भारतीय संघात नक्कीच निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सूर्यकुमारची एकदिवसीय, टी 20 किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. चमकदार कामगिरीनंतरही सूर्युकमारला संधी मिळाली नाही. संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमार खूप निराश झाला होता. त्यावेळी क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सूर्यकुमारला एक खास मेसेज पाठवला, ज्यामुळे सूर्यकुमारला प्रोत्साहन मिळाले. (Suryakumar Yadav was disappointed for not selected in the Indian team, was encouraged by Sachin Tendulkar’s special message)

सूर्यकुमारने याबाबत सांगितले की, संघात निवड न झाल्याने तो दुःखी होतो. त्यावेळी सचिनच्या एका मेसेजने त्याला अधिक बळ मिळालं. सूर्यकुमारला सचिनने एक मेसेज पाठवला होता. ज्यात मास्टर ब्लास्टरने सूर्यकुमारला त्याची मेहनत आणि प्रयत्न सुरु ठेवण्यास सांगितले होते. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने याबाबत माहिती दिली. सचिने सूर्यकुमारला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते की, “तू तुझ्या खेळाशी एकनिष्ठ आणि इमानदार राहशील तेव्हा हा खेळ तुझी काळजी घईल. आत्ता तुझ्यासमोर जो अडथळा दिसतोय तो कदाचित शेवटचा असू शकतो. भारतासाठी खेळणं हे तुझं स्वप्न लवकरच सत्यात उतरु शकतं. स्वतःला क्रिकेटसाठी समर्पित कर. मला माहीत आहे की, तू लगेच हार मानणाऱ्यांपैकी नाहीस, तू चालत राहा आणि आम्हाला आनंदी होण्याची कारणं देत राहा.

दरम्यान, भारतीय संघात निवड न झाल्याबद्दल सूर्यकुमारने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आणि त्यात माझं नाव नव्हतं. तेव्हा मी फार निराश होतो. माझी निवड होईल, अशी मला आशा होती. मी आयपीएलमध्ये चांगली फंलदाजी करत होतो. मी गेल्या 2 वर्षांपासून चांगली कामगिरी करत होतो”

“माझी संघात निवड झाली नाही. मात्र मी यानंतर फार विचार करत बसलो नाही. जेव्हा टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली, तेव्हा मी जीममध्ये होतो. निवड न झाल्याने मी निराश होऊन सराव बंद केला. माझ्याकडे एक दिवसाचा वेळ असल्याने मी जीममध्ये प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग घेत होतो. निवड न झाल्याची बाब डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्या रात्री मी जेवणही केलं नव्हतं. माझं कशातही मन लागत नव्हतं. मी तेव्हा कोणाशी बोललोही नाही”, असं सूर्यकुमार म्हणाला.

रोहितने येऊन प्रोत्साहित केलं

“मी निराश असल्याचं पाहून रोहित शर्मा माझ्याजवळ आला. रोहितने माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवड झाली नाही, याबाबत फार विचार करु नकोस. तुला नक्कीच संधी मिळेल. त्या संधीची वाट बघ. तुझ्याकडे निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांच लक्ष वळवण्याची संधी आहे. ती संधी दवडू नकोस”. असा सल्ला रोहितने दिल्याचं सूर्यकुमार म्हणाला.

रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

सूर्यकुमारने या मोसमात चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतरही त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारला ट्विटद्वारे संदेशा दिला होता. ‘सूर्य नमस्कार, असाच कणखर रहा आणि धीर ठेव, असा मेसेज शास्त्री यांनी दिला होता.

सूर्यकुमारची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी

सूर्यकुमार आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकनंतर सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.

संबंधित बातम्या

IPL 2020 | पाच वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या तगडया मुंबईला पराभूत करण्यासाठी प्रज्ञान ओझा आणि दीपदास गुप्ताची बेस्ट टीम

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

(Suryakumar Yadav was disappointed for not selected in the Indian team, was encouraged by Sachin Tendulkar’s special message)

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.