AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर (Chatrasal Stadium) पैलवान सागर धनखड (Sagar Dhankhar) याच्या हत्या प्रकरणात एक व्हिडिओ समोर आला आहे. (Sushil Kumar With Stick beating Sagar Dhankhar Video Viral0)

Sagar Dhankhar Murder: जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता, सुशील कुमार दंडुक्याने मारत होता, मर्डरदिवशीचा Video व्हायरल
सुशील कुमार
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 9:50 AM

मुंबई :  दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर (Chatrasal Stadium) पैलवान सागर धनखड (Sagar Dhankhar) याच्या हत्या प्रकरणात एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पैलवान सुशील कुमारच्या (Sushil Kumar) हातात एक लाकडी दंडुका दिसत आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा सागर धनखडची हत्या केली गेली. व्हिडिओमध्ये सुशील कुमार सागर धनखड, सोनू महल आणि त्याच्या मित्रांना मारहाण करताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे उपलब्ध आहे. (Sushil Kumar With Stick beating Sagar Dhankhar Video Viral)

जमिनीवर पडलेला सागर हात जोडत होता अन्….

त्याचबरोबर टीव्ही 9 जवळही असा एक फोटो आहे ज्यामध्ये सुशील कुमारच्या हातात दंडुका आहे. हा फोटो 4 मेच्या रात्रीचा असल्याची शक्यता आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये छत्रसाल स्टेडियममध्ये बर्‍याच लोकांची गर्दी दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये सुशील कुमार देखील स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, जमिनीवर पडलेला सागर धनकड सुशील कुमारसमोर विनवणी करत हात जोडताना दिसून येतोय. तरीदेखील सुशील कुमार त्याला एखाद्या प्राण्यासारखा मारतोय.

सुशील कुमारने सागरला मार मार मारलं….

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात रिवॉल्वर किंवा कट्टा यासारखं शस्त्र दिसत आहे. इतकंच नाही तर काळा असौदा गँग आणि नीरज बावनिया गँगचे काही बदमाश देखील दिसून येत आहेत. या सर्व गुंडांच्या हातात लाकडी दांडके आणि आणखी बऱ्याच लाठ्या-काठ्या दिसून येत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत सुशील कुमार सागर धनकड आणि त्याच्या एका साथीदाराला मारहाण करत आहे.

तो व्हिडीओ सुशील कुमारचाच, पाहणीत समोर

त्याचवेळी व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वाहनांवरही पोलिसांचा संशय आहे की ही वाहनं टोळीतील गुंडांचीच आहेत. विशेष म्हणजे फॉरेन्सिक तपासणीत हा व्हिडिओ खरा मानला गेलाय. या व्हिडीओत कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही, असंही समोर आलं आहे.

पोलिसांनी सुशीलला हा व्हिडीओ दाखवला अन्…

चौकशीदरम्यान पोलिसांनी सुशील कुमारला हा व्हिडिओ दाखविला. ज्यामध्ये तो हातात काठी घेऊन सागर धनखडवर हल्ला करत आहे. व्हिडिओ पाहून सुशील चकित झाला. रिपोर्टनुसार सुशील कुमारने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत घटनेच्या रात्री दोन गट एकमेकांशी भांडत होते. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास सुशीलचा ग्रुप स्टेडियमच्या बाहेर गेला.

(Sushil Kumar With Stick beating Sagar Dhankhar Video Viral)

हे ही वाचा :

सागर धनखड हत्या : पैलवान सुशीलकुमारला मोठा झटका, रेल्वेतून हकालपट्टी, नोकरी गमावली!

कुस्तीत दोनदा ऑलिम्पिक, आडदांड पैलवानांना लोळवलं; पण पोलिसांचा खाक्या बसताच सुशील कुमार रडला

हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर

Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.