वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा

वास्तवात वनडे फॉर्मेटमध्ये (ODI Cricket) भारताच्या गोलंदाजीची तुलना सर्वात दुबळ्या संघांविरुद्ध करावी लागेल, याचा कोणीही विचार केला नसेल. क्रिकेटच्या खेळात कधी तुम्ही झपकन खाली याला, याचा नेम नसतो.

वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 12:19 PM

मुंबई: सध्याच्या घडीला भारताकडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा (Team India’s Bowling) ताफा आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजीला वर्ल्डक्लास ठरवलं जातं. पण वास्तवात वनडे फॉर्मेटमध्ये (ODI Cricket) भारताच्या गोलंदाजीची तुलना सर्वात दुबळ्या संघांविरुद्ध करावी लागेल, याचा कोणीही विचार केला नसेल. क्रिकेटच्या खेळात कधी तुम्ही झपकन खाली याला, याचा नेम नसतो. 2019 वर्ल्डकपमधील (2019 World Cup) ज्या भारतीय गोलंदाजांचा दबदबा होता, सध्या तेच प्रभावहीन झाले आहेत. वेग आहे पण ती दहशत नाहीय. चेंडू वळतात पण फलंदाज त्या तालावर नाचत नाही. त्यामुळेच भारतीय गोलंदाजीची तुलना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड सारख्या दुबळ्या संघांबरोबर करण्याची वेळ आली आहे.

2019 वर्ल्डकपमध्ये जसे सामने खेळले जायचे, तसेच आताही सामने सुरु आहेत. आताही तसाच पावर प्ले आहे. पण आता पावरप्ले भारतीय गोलंदाजांची ती ताकत दिसत नाही. भारतीय गोलंदाजांना आता विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. 2019 वर्ल्डकपनंतर भारताने न्यूझीलंड पासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत जे दौरे केले. त्यामध्ये सुरुवातील पावर प्लेमध्ये विकेट न मिळणं हे टीमच्या पराभवामागचं मुख्य कारण आहे.

2019 वर्ल्डकप नंतर भारताची खराब गोलंदाजी वनडे क्रिकेटमध्ये पहिला पावरप्ले म्हणजे सुरुवातीच्या दहा षटकातील खेळ. या टप्प्यावर 2019 वर्ल्डकपनंतर भारतीय गोलंदाजांची कामगिरी खूपच खराब आहे

2019 वर्ल्डकपनंतर वनडे सामन्यांमध्ये पहिल्या 10 षटकात सर्वात कमी विकेट घेणाऱ्या टीम्समध्ये भारत टॉपवर आहे. भारताची सरासरी आणि इकोनॉमी सुद्धा खराब आहे. 2019 वर्ल्डकपनंतर भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पावर प्लेमध्ये आतापर्यंत 23 वेळा गोलंदाजी केलीय. यात त्यांची इकोनॉमी 5.74 असून 132.10 च्या सरासरीने फक्त 10 विकेट घेतल्या आहेत.

झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची कामगिरी भारतापेक्षा चांगली भारतापेक्षा झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडने पहिल्या पावरप्लेमध्ये सरस कामगिरी केली आहे. झिम्बाब्वेने 2019 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पहिल्या 15 डावात 4.65 च्या इकॉनमी आणि 63.45 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्यात. तेच अफगाणिस्तानने सात डावात 4.40 इकॉनमी आणि 28 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्यात. स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी 11 डावात 4.41च्या इकॉनमी आणि 40.50 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्यात.

team India bowlers fail to take wicket in first powerplay of mens odis since 2019 wc

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.