Champions Trophy जिंकण्याच हे इनाम? टीम इंडियातून BCCI या लोकांचा पत्ता करणार कट
भारतीय क्रिकेट टीमच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा रविवारी होऊ शकते. गौतम गंभीर आणि बीसीसीआई सचिवांदरम्यान होणाऱ्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. टीम इंडियाच्या काही सदस्यांचा पत्ता कट होऊ शकतो.

भारतीय क्रिकेट टीमने सलग दोन आयसीसी टुर्नामेंट जिंकून कमाल केली आहे. त्यांच्या या यशात फक्त खेळाडूच नाही, सपोर्ट स्टाफची सुद्धा भूमिका आहे. आता बातमी अशी आहे की, बीसीसीआय लवकरच टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ कमी करु शकतो. गौतम गंभीरच्या टीमचा सपोर्ट स्टाफ कमी केला जाऊ शकतो. फिल्डिंग कोच टी दिलीप, जे चार वर्षांपासून टीमशी संबंधित आहेत, ते आपलं स्थान गमावू शकतात. गंभीर, मोर्ने मोर्केल, रायन टेन डेस्काथे आणि अभिषेक नायर सारख्या सदस्यांचे कॉन्ट्रॅक्ट कायम राहतील. BCCI काही नव्या सदस्यांचा समावेश करण्यासह सपोर्ट स्टाफ कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
बीसीसीआयकडून 30 मार्च रोजी टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर निर्णय घेतला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार BCCI सचिव देवजीत साइकिया चीफ सिलेक्टर अजीत आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीरसह आयपीएल 2025 मध्ये CSK vs RR मॅच दरम्यान या मुद्यावर चर्चा करु शकतात. सामान्यत: आयपीएलआधी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होते. पण यावेळी विलंब झालाय. BCCI कडून चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्याची प्रतिक्षा केली जातेय असं आधी रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता.
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर निर्णय कधीपर्यंत?
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार BCCI सचिव रविवारी गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टवर चर्चा करतील. भारताचे हेड कोच गौतम गंभीर चर्चेसाठी उपलब्ध नाहीत, हे घोषणेला विलंब होण्यामागच कारण होतं. गौतम गंभीर कुटुंबासोतब फ्रान्स येथे सुट्टीवर गेले आहेत. BCCI च्या एका टॉप अधिकाऱ्याच्या निकटवर्तीयाने आधीच टीम मॅनेजमेंट आणि चीफ सिलेक्टरसोबत फोनवर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत चर्चा केलीय. रिपोर्ट्सनुसार बोर्ड आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात कॉन्ट्रॅक्ट बाबत एकमत नाहीय. 30 मार्चला होणाऱ्या बैठकीत या मुद्यावर निर्णय होऊ शकतो. मोठा प्रश्न हा आहे की, T20 फॉर्मेटमधून निवृत्त झालेला रोहित आणि विराट ए प्लस कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल का?