मला या निर्भिड आणि बिनधास्त खेळाडूंचा अभिमान, प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून टीम इंडियाचं कौतुक
टीम इंडियाने (Team India) आयसीसीच्या वार्षिक कसोटी क्रमवारीत (icc test ranking) सलग 5 वर्ष अव्वल स्थान कायम राखलं. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी (head coach ravi shastri) आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
मुंबई : टीम इंडिया (Team India) गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) चमकदार कामगिरी करतेय. आयसीसीने नुकतीच (ICC Test Ranking) वार्षिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाने सलग 5 वर्षी अव्वल स्थान कायम राखलं आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने विराटसेनेने अव्वल स्थान कायम राखण्यात यश आले आहे. यावरुन टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचं कौतुक केलं आहे. शास्त्री यांनी ट्विट करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. (team india head coach ravi shastri praised after retain 1st spot in icc test ranking players about performence)
↗️ England overtake Australia↗️ West Indies move up two spots to No.6
India and New Zealand remain the top two sides after the annual update of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings.
? https://t.co/79zdXNIBv3 pic.twitter.com/tUZsgzkE0z
— ICC (@ICC) May 13, 2021
शास्त्री काय म्हणाले?
“क्रमवारीत अव्वल स्थानसाठी या संघाने दृढ निश्चयासह कठोर मेहनत घेतली आहे. खेळाडूंनी लक्ष्य गाठण्यासाठी सातत्यापूर्ण मेहनत केली. या मुलांनी प्रामाणिकपणे ही कमाई केली आहे. या दरम्यान अनेक अडचणी आल्या. या खेळाडूंनी या अडचणींचा सामना केला. त्यावर मात केली. या निर्भिड आणि बिंधास्त खेळाडूंवर मला गर्व आहे”, असं शास्त्री म्हणाले.
This ??team has shown steely resolve & unwavering focus to be crowned No. 1. It is something the boys have earned fair & square. Rules changed midway but #TeamIndia overcame every hurdle along the way. My boys played tough cricket in tough times. Super proud of this bindass bunch pic.twitter.com/StzcsexCRF
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) May 13, 2021
टीम इंडियाची शानदार कामगिरी
टीम इंडियाने मागील 2 कसोटी मालिकेत धमाका केला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर घरेलू मालिकेत पाहुण्या इंग्लंडचा 3-1 अशा एकतर्फी फरकाने पराभव केला. या कामगिरीचा फायदा भारताला क्रमवारीतील पहिलं स्थान अबाधित ठेवण्यात झाला.
मिशन इंग्लंड
टीम इंडियासमोर आता न्यूझीलंड आणि इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अजिंक्यपदासाठी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना साउथम्पटनमध्ये 18-22 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,
संबंधित बातम्या :
Wriddhiman Saha | रिद्धीमान साहाला दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?
World Test Championship Final 2021 | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाल्यास ट्रॉफी कुणाला?
(team india head coach ravi shastri praised after retain 1st spot in icc test ranking players about performence)