चहलच्या आयुष्यात वादळ, धनश्रीचा त्या मुलासोबतचा क्लोज फोटो चर्चेत, कोण आहे तो?
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce Rumours : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद झाल्याच्या बातम्या येत आहेत. हे जोडपं लवकरच घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे. या दरम्यान धनश्री वर्माचा एका मुलासोबत फोटो व्हायरल होतोय. हा मुलगाच या घटस्फोटाला कारणीभूत आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलच्या व्यक्तीगत आयुष्यात सर्वकाही आलबेल नाहीय. मागच्या दोन-तीन दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे संबंध बिघडल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर परस्परांना अनफॉलो केलय. त्याशिवाय परस्परांसोबतचे फोटोही काढून टाकले आहेत. या दरम्यान धनश्री वर्माचा सोशल मीडियावरील एक फोटो खूप व्हायरल होतोय, ज्यात ती एका मुलासोबत दिसतेय.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं वर्ष 2022 मध्ये खूप चर्चेत होतं. त्यावेळी धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमधून चहल शब्द हटवला होता. त्याचवेळी लग्नात काही अडचणी आहेत का? अशा चर्चा सुरु झालेल्या. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होतोय. यात धनश्री वर्मा एका मुलासोबत खूप क्लोज दिसतेय. अशावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतोय, या मुलामुळेच धनश्री-युजवेंद्रचा घटस्फोट होतोय का?.
धनश्रीसोबतचा फोटोमधला तो मुलगा कोण?
धनश्री वर्मा सोबत दिसणारा हा मुलगा आणखी कोणी नाही, कोरियोग्रोफर प्रतीक उतेकर आहे. हा फोटो काही महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा तिने डान्स रियलटी शो झलक दिखला जा मध्ये सहभागी झालेली. त्यावेळी हा फोटो खूप व्हायरल झालेला. धनश्रीला त्यावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. दोघे खूप चांगले मित्र आहेत. चहर-धनश्रीच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोरियोग्राफर प्रतीक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
चहलने चेहरा का लपवला?
धनश्री वर्माचा कोरियोग्राफर प्रती उतेकरसोबतचा हा जुना फोटो आहे. पण युजवेंद्र चहल नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. मीडिया रिपोर्ट्नुसार चहलला जुहू भागात या मिस्ट्री गर्लसोबत पाहण्यात आलं. दोघे कारमध्ये एकत्र होते. यावेळी माडियाचे कॅमेरे बघून चहलने आपला चेहरा लपवला. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच लग्न डिसेंबर 2020 मध्ये झालं होतं. मागच्याच महिन्यात त्यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली. दोघांपैकी कोणीच सोशल मीडियावर काही पोस्ट केलं नाही. त्यावेळीच दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झालेली.