Maharashtra Kesari: कोण होणार महाराष्ट्र केसरी, कोणाचा दावा आहे प्रबळ, आज फैसला

पुणे : पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) अंतिम टप्पा आला आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. मॅट विभागातील अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात सामना रंगणार आहे. तर माती विभागात अंतीम लढतीत सोलापूरचा सिकंदर […]

Maharashtra Kesari: कोण होणार महाराष्ट्र केसरी, कोणाचा दावा आहे प्रबळ, आज फैसला
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 11:21 AM

पुणे : पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) अंतिम टप्पा आला आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. मॅट विभागातील अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात सामना रंगणार आहे. तर माती विभागात अंतीम लढतीत सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांची लढत होईल. मॅट आणि माती विभागातील दोन अंतीम लढती शनिवारी संध्याकाळी होणार आहे. या दोन्ही लढतीमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी अंतीम लढत होईल.

कशी होते लढत : महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभागमध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते. ही लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅटवर घेतली जाते. या लढतीमधील अंतिम विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ होतो. त्या मल्लास महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

हे सुद्धा वाचा

सदगीर होणार डबल महाराष्ट्र केसरी पुण्यातील बालेवाडीत झालेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने २०२० मध्ये महाराष्ट्र केसरीचे विजेतपद पटकवले होते. नाशिकच्या बलकवडे आखाड्यात सदगीरने कुस्तीचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर पुण्यात काका पवार यांच्याकडे कुस्तीचे धडे घेतले. काका पवारांचा शिष्य म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याला मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभवही आहे. आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. सदगीर डबल महाराष्ट्र केसरी होणार का, हे आज संध्याकाळीच स्पष्ट होईल.

नांदेडचा राक्षे दावेदार : नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार आहे. दुखापतीतून सावरत त्याने मॅट विभागाची अंतीम लढत गाठली आहे. त्याची लढत हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र केसरीसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळं आता यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा निश्चय असल्याचे शिवराज राक्षे याने म्हटले आहे.

कशी बनती गदा :

महाराष्ट्र केसरीला दिली जाणारी गदा सागाच्या लाकडापासून बनवली जाते. त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी २८ गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. गदेचे वजन सुमारे ८ ते १० किलो असते. गदेची उंची ही साधारण २७ ते ३० इंच असते. तिचा व्यास ९ ते १० इंच असतो. या गदेवर एका बाजूला हनुमानाचे तर दुसऱ्या बाजूला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते .

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.