भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला, नरेंद्र मोदींकडून ट्विट करत अभिनंदन
भारताला टोकिया ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला
टोकियो: भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. कझाकिस्तानच्या सनायेव नूरिस्लामला धोबीपछाड देत रवीने सेमीफायनल सामन्यात 57 किलो वजनी गटात दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरित प्रवेश केला आहे. (wrestler Ravi Dahiya at Tokyo Olympic 2021) अंतिम फेरीत पराभव झाल्यानं रवी दहियाला रौप्य पदक मिळालं आहे. तर, दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
#TokyoOlympics | Wrestler Ravi Dahiya gets #Silver medal, loses to ROC’s Zavur Uguev in men’s Freestyle 57 kg final. pic.twitter.com/EUFWe1McAh
— ANI (@ANI) August 5, 2021
भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्चाने रवी 3 गुणांनी कमी पडला आणि 7-4 ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं
नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंंदन
Ravi Kumar Dahiya is a remarkable wrestler! His fighting spirit and tenacity are outstanding. Congratulations to him for winning the Silver Medal at #Tokyo2020. India takes great pride in his accomplishments.
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
रवीकुमार दहिया हा अप्रतिम कुस्तीपटू आहे. लढण्याच त्यानं दाखवलेलं स्पिरीट अतुलनीय आहे. रौप्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ५७ किलो वजनी गटात त्याने हा पराक्रम केला असून भारताकडून कुस्तीमध्ये पदक जिंकणारा तो पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. देशाचे नाव उंचावल्याबद्दल रवीचे मनःपूर्वक अभिनंदन ! pic.twitter.com/d1JxRE5wAJ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 5, 2021
इतर बातम्या:
Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय
Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई