एथलेटिक्स फेडरेशनकडून नीरजचा अनोखा सन्मान, सुवर्णपदक जिंकलेल्या दिवसाला केलं खास, मोठी घोषणा करत नीरजला सुखद धक्का
भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकासह बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Tokyo Olympic 2021 : शनिवारी (7 ऑगस्ट) संंपूर्ण भारतात केवळ एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाला आणखी खास करण्यासाठी भारतीय एथलेटिक्स महासंघाने (AFI) दरवर्षी 7 ऑगस्टरोजी देशभरात राज्य स्तरीय भालाफेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
भारताने यंदा ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकली. पण यामध्ये केवळ एकच सुवर्णपदक होतं. तेही व्यक्तिगत स्पर्धेत नीरज चोप्राने मिळवलेलं. यापूर्वी भारताच्या अभिनव बिंद्रा याने 2008 मध्ये निशानेबाजीत सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यामुळे अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरजवर संपूर्ण देशांतून बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
नीरजने व्यक्त केला आनंद
नीरज चोप्राने या घोषणेवर आनंद व्यक्त कर AFI ला धन्यवाद म्हटले. तो म्हणाला, ‘मला हे ऐकून फार आनंद होत आहे. मी भारतीय एथलेटिक्स महासंघाला धन्यवाद देऊ इच्छितो. मला आनंद आहे की मी माझ्या देशासाठी एक प्रेरणा बनलो आहेत. मला पाहून लहानगे प्रेरीत होणार याचा मला आनंद आहे.”
नीरजवर बक्षिसांचा वर्षाव
या ऐतिहासिक विजयानंतर नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.
इतर बातम्या
सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(AFI announces javelin throw events on evry 7th aug e to remeber neeraj chopras tokyo Olympic gold medal success)