Tokyo Olympic 2021 : सामन्यापूर्वी हॉकी संघाच्या प्रशिक्षकाने खेळाडूंना खुर्चीवर उभं करत वाढवला आत्मविश्वास, गोलकिपर श्रीजेशने केला खुलासा
कोणत्याही संघाच्या विजयात खेळाडूंसह संपूर्ण संघ व्यवस्थापनाचाही मोठा हात असतो. यामध्ये प्रशिक्षक हाच गुरु असल्याने त्याच्या खेळाडूंसोबतच्या संबधानी देखील संघाचा खेळ सुधारतो.
Tokyo Olympic 2021 : भारत विरुद्ध जर्मनी यांच्यात कांस्यपदकासाठी सुरु असलेल्या सामन्यात अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना जर्मनी संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाली. ही पेनल्टी अनुभवी गोलकीपर पी आर श्रीजेश (P r sreejesh) याने रोखली आणि चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर भारताच्या पदरात ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकीचं पदक पडलं. संघातील खेळाडू एकमेकांना मिठी मारु लागले. गोलकीपर पीआर श्रीजेशने आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात बहुप्रतिक्षित क्षण अनुभवताना सामन्याआधी प्रशिक्षक ग्राहम रीड (Graham Reid) यांनी सांगितलेली एक खास गोष्ट सर्वांशी शेअर केली.
स्पोर्ट्सकीड़ा या वेबसाईटशी बोलताना श्रीजेश म्हणाला, “हा भारतासाठी आणि भारतीय हॉकीसाठी एक खूप मोठा दिवस आहे. माझं एक स्वप्न पूर्ण होत आहे. तब्बल 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मी हा क्षण अनुभवत आहे. ” यानंतर सामन्यापूर्वी प्रशिक्षक ग्राहम यांनी कशाप्रकारे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला याबद्दल सांगताना श्रीजेश म्हणाला,”सामन्याच्या अखेरच्या क्षणांत खूपच तणावपूर्ण वातावरण होतं. मला काही करुन पेनल्टी वाचवायची होती. त्यावेळी सामन्याआधी कोच ग्राहम यांनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवली. त्यांनी सामन्यापूर्वी आम्हा सर्वांना खुर्चीवर उभं करत सांगितंल, विचार करा ही खुर्ची नसून पोडीयम आहे आणि तुमच्या सर्वांच्या गळ्यात एक पदक आहे. मी हूटर वाजल्यानंतर हीच गोष्ट आठवली आणि पेनल्टी सेव्ह केली.”
‘आता माझ्याकडे पदक आहे’
पीआर श्रीजेश हा भारतीय हॉकी संघातील एक सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मागील बरीच वर्षे संघाकडून खेळणाऱ्या श्रीजेची ही तिसरी ऑलिम्पिक होती. दरम्यान इतक्या प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिक पदक मिळाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया विचारली असता. तो म्हटला, ”मी छोटी पाऊलं टाकत सुरुवात केली होती. आज माझ्याकडे पदक आहे. ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे.”
आनंद साजरा करताना गोलपोस्टवर चढला श्रीजेश
भारताच्या विजयानंतर आनंदाच्या भरात श्रीजेश थेट गोलपोस्टवरच चढला. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी जेव्हाही निराश होतो मी माझ्या मैदानावरील मित्रांशी बोलतो. ते म्हणजे माझे पॅड्स आणि गोलपोस्ट. जेव्हाही चेंडू गोलपोस्टला लागतो मी त्याच्याशी बोलतो अशाचप्रकारे आडव आणि जेव्हा मैदानावर माझ्या जवळ कोणता खेळाडू बोलायला नसतो तेव्हा माझ्यासोबत माझे पॅड असतात. त्यामुळे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मी त्यांच्यासह गोलपोस्टवर बसलो आहे. ”
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : भारतीय हॉकी संघाच्या 9 धुरंदरानी दागले 23 गोल, रचला इतिहास, मिळवले कांस्यपदक
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(After indian hockey team won bronze goalkeeper p sreejesh reveals how Coach Graham Reid motivated them before match )