ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला; कोरोनाच्या भितीने केली चाचणी

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक कमावले आहे. केवळ या स्पर्धेतच नव्हे तर भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील हे देशासाठीचे पहिले सुवर्णपदक आहे.

ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला; कोरोनाच्या भितीने केली चाचणी
ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर नीरज चोप्रा तापाने फणफणला
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:34 PM

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले अ‍ॅथलेटिक्स सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला खूप ताप आला होता. खूप थकवा आल्यामुळे तो तापाने हैराण झाला होता. आता त्याची प्रकृती सुधारत आहे. त्याला कोरोना झाला की काय, या भितीने त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. सुदैवाने त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नीरज भारतात आला, त्या दिवसापासून तो सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. या धावपळीत त्याला खूप थकवा जाणवू लागला. त्यातच त्याला तापही आला. (After returning from the Olympics, Neeraj Chopra developed a fever)

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक कमावले आहे. केवळ या स्पर्धेतच नव्हे तर भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या इतिहासातील हे देशासाठीचे पहिले सुवर्णपदक आहे. नीरजने अंतिम सामन्यात 87.58 मीटरपर्यंतच्या भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा नीरज चोप्राला जागतिक क्रमवारीमध्येही मोठा फायदा झाला आहे. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी तो जागतिक क्रमवारीमध्ये 16 व्या क्रमांकावर होता. आता आॅलिम्पिक चॅम्पियन बनल्यानंतर जागतिक क्रमवारीत तो दुसर्या क्रमांकावर आला आहे. त्याने रँकिंगमध्ये 15 स्थान पुढे झेप घेतली आहे.

नीरज चोप्राचे नवीन उद्दीष्ट

टोकियोमधून सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या नवीन उद्दीष्टाचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या नवीन उद्दीष्टाबद्दल सांगितले. नीरज म्हणाला की, आता जागतिक चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकून अंजू बॉबी जॉर्जच्या क्लबमध्ये सामील होणे हे माझे पुढील उद्दीष्ट आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारी अंजू जॉर्ज एकमेव भारतीय आहे. 2003 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंजूने कांस्य पदक जिंकले होते. पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचा नीरजचा मानस आहे.

नीरजच्या जर्मन प्रशिक्षकाच्या गावातही सुवर्णपदकाचा जल्लोष

नीरजला सुवर्णपदक जिंकून देण्यात त्याचे जर्मन प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ यांचा सिंहाचा वाटा आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील नीरजच्या यशात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ऑलिम्पिकनंतर क्लॉस हे ज्यावेळी त्यांच्या जर्मनीतील गावी पोहोचले, त्यावेळी तेथेही नीरजच्या सुवर्णपदकाचा जल्लोष साजरा केला जात असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. क्लॉस यांचे अत्यंत छोटे गाव असून ते पूर्व जर्मनीमध्ये जंगलांनी वेढलेले आहे. नीरजला सुवर्णपदक मिळाल्यापासून क्लॉस हे आता तेथील लोकांसाठी एक सेलिब्रिटी बनले आहेत. (After returning from the Olympics, Neeraj Chopra developed a fever)

इतर बातम्या

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला करणे भोवले, हत्यारबंद ड्रग पेडलरविरोधात गुन्हा दाखल, एनसीबी अ‌ॅक्शन मोडमध्ये

‘ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल’, पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.