ऑलिम्पिकमध्ये सोनं लुटणाऱ्या नीरजवर पैशांचा पाऊस, पाहा कुणाकडून किती रकमेच्या बक्षिसांची घोषणा!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या नीरजवर संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्याला भारतातील नामांकित व्यक्ती आणि संस्थासह सरकार बक्षिस म्हणून कोट्यवधी रुपये देत आहे.

ऑलिम्पिकमध्ये सोनं लुटणाऱ्या नीरजवर पैशांचा पाऊस, पाहा कुणाकडून किती रकमेच्या बक्षिसांची घोषणा!
मणिपूर कॅबिनेटमध्ये नीरजला बक्षिस जाहीर
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 12:34 PM

Tokyo Olympic 2021 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदक मिळवलं आणि संपूर्ण देशांत आनंदोत्सव सुरु झाला. देशाला हा सर्वोच्च बहुमान मिळवून देणाऱ्या नीरजचा सन्मान करण्यासाठी देशातील अनेक नामांकित व्यक्ती आणि संस्थांनी नीरजला बक्षिस जाहीर केलं ज्यामध्ये विविध राज्यातील सरकारचा देखील वाटा आहे.

या सर्वांची सुरुवात नीरज रहिवासी असलेल्या हरियाणा राज्याने केली. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन करत सरकारच्यावतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. तसेच त्याला क्लास वन दर्जाची नोकरी आणि पंचकुलामध्ये एथलेटिक्स सेंटर ऑफ एक्सीलेन्सचा अध्यक्ष बनवण्याचंही जाहीर केलं.

अमरिंदर सिंग यांच्याकडून 2 कोटी

हरयाणा पाठोपाठ शेजारी राज्य पंजाबने देखील नीरजला बक्षिस जाहीर केलं. पंजाब सरकारने नीरजला बक्षिस म्हणूनदोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली.

मणिपूर सरकारकडूनही बक्षिस

हरयाणा आणि पंजाब सरकारपाठोपाठ मणिपूर राज्य सरकारने देखील नीरज चोप्राला 1 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. मणिपूर राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला.

BCCI कडून 1 कोटी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये नीरजला एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 25 लाख दिले जातील. तर भारतीय हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली.

चेन्नई सुपरकिंगनेही केलं अभिनंदन

बीसीसीआयसोबत इंडियन प्रीमियर लीगमधील संघ चेन्नई सुपर किंग्सने (CSK) नीरजne एक कोटी रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. सीएसके संघ प्रशासनाने दिलेल्या माहिती त्यांनी म्हटलं, ‘नीरज चोप्राने मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल त्याला एक कोटी रुपये बक्षिस म्हणून चेन्नई सुपरकिंग देणार असून त्याच्यासाठी 8758 नंबरची विशेष जर्सी देखील तयार करणार आहे.’

बायजूज देणार दोन कोटी रुपये

ऑनलाईन शिक्षण देणारी कंपनी बायजूजने देखील नीरजला बक्षिस म्हणून दोन कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या इतर खेळाडूंना देखील बायजूज रोख रक्कम म्हणून 1 कोटी रुपये बक्षिस देणार आहे.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(After winning gold medal at tokyo olympics neeraj chopra awarded with crors of cash price from government)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.