Tokyo Olympics 2021: मीराबाईचं मायदेशी जंगी स्वागत, ‘सिल्व्हर क्वीन’ची थेट ASP पदी नियुक्ती

टोक्यो ऑलिम्प्किमध्ये भारताला भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिल्यानंतर मीराबाई मायदेशी परतली आहे. सोमवारी सायंकाळी ती नवी दिल्ली विमानतळावर पोहचली.

Tokyo Olympics 2021: मीराबाईचं मायदेशी जंगी स्वागत, 'सिल्व्हर क्वीन'ची थेट ASP पदी नियुक्ती
मीराबाई चानू
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:26 PM

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu)  नुकतीच मायदेशी परतली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मीराबाईचं नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे तिला मणिपूर सरकारने अतिरिक्त पोलीस अधिक्षकपद बहाल केलं आहे.

चानू तिच्या सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यावेळी तिने मास्क आणि फेस शील्ड घालत कोरोना नियमांचे पालन केले. दरम्यान भारतात आल्यानंतर तिने ट्विट करत आनंद व्यक्त केला. तिने लिहिले, ‘इतक्या प्रेमासह सपोर्टमुळे मी परत येऊन खूप आनंदी आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.’

202 किलो वजन उचलत मिळवलं रौप्य पदक

मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वर्गात कमाल कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं.

वेटलिफ्टिंगमध्ये ओलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय

ओलिम्पिक सारख्या भव्य मंचावर मीराबाई चानूने अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं. याआधी अशी कामगिरी 21 वर्षांपूर्वी म्हणजे 200 च्या सिडनी ओलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नम मल्लेश्वरीने केली होती. तिने 69 किलो वर्गात कांस्य पदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं.

हे ही वाचा :

प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(After winning silver medal in tokyo Olympic Mirabai Chanu reached india Manipur Govt appoint her as Additional Superintendent of Police)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.