Novak Djokovic : वर्ल्ड चॅम्पियन नोव्हाकचं पदक जिंकण्याचं स्वप्न तुटलं, ज्वेरेवकडून सेमीफायनलमध्ये पराभूत
Tokyo Olympics 2020 : नोव्हाक जोकोविचला सर्वात मानाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिला पराभव पत्करावा लागला आहे. ओलिम्पिक आधी तिन्ही ग्रँड स्लॅम जिंकलेल्या नोव्हाकला सेमीफायनलमधून स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे.
Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) एकापेक्षा एक धक्कादायक निर्णय समोर येत आहेत. जगातील नंबर एकचा बॅडमिंटनपटू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) देखील सेमीफायनलच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. जर्मनीच्या एलेक्जेंडर ज्वेरेवने (Alexander Zverev) नोव्हाकला सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत केलं आहे.
पुरुष एकेरी स्पर्धेच्या सेमी फायनलच्या सामन्यात जोकोविच आणि ज्वेरेव आमने-सामने होते. तीन सेट्स चाललेल्या सामन्यात 1-6, 6-3, 6-1 च्या फरकाने ज्वेरेवने नोव्हाकला नमवत स्पर्धेबाहेर केलं. या पराभवासोबतच जोकोविचच ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करण्याचं स्वप्नही अधुरं राहिलं. फायनलच्या सामन्यात ज्वेरेवची टक्कर रशियाच्या केरन खाचानोव याच्यासोबत असणार आहे.
असा झाला सामना
जोकोविचने पहिल्या सेटमध्ये आक्रमक अंदाज दाखवत ज्वेरेववर 6-1 ने विजय मिळवला. ज्वेरेवला पुनरागमन करण्याची संधीच नोव्हाकने दिली नाही. पण दुसऱ्या सेटमध्ये ज्वेरेवने दमदार पुनरागमन केलं. दुसरा सेट 6-3 ने ज्वेरेवने खिशात घातला. त्यानंतर मात्र नोव्हाकला सामन्यात आघाडी घेण्याची संधीच ज्वेरेवने दिली नाही. शेवटचा सेटही ज्वेरेवने 6-1 ने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
इतर बातम्या:
Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा यामागुचीवर विजय, सेमी फायनलचं तिकीटं मिळवत पदकाच्या अगदी जवळ
Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार
Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या
(Alexander zverev beats Novak djokovic in Semifinal at Tokyo Olympics 2021)