Tokyo Olympics 2021 : ‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार बनला चीयरलीडर, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे वाढवणार प्रोत्साहन

टोक्यो ऑलम्पिकला सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या ऑलम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी 'हा' सुपरस्टारही सज्ज झाला आहे.

Tokyo Olympics 2021 : 'हा' बॉलीवूड सुपरस्टार बनला चीयरलीडर, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे वाढवणार प्रोत्साहन
टोकियो ऑलम्पिक
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 12:22 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) 119 खेळाडूंसह 228 सदस्यांची तुकडी भारताने पाठविली आहे. या 119 खेळाडूंपैकी 67 पुरुष आणि 52 महिला खेळाडू आहेत. ऑलिम्पिकमधील हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ताफा आहे. भारत यावेळी 87 स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. दरम्यान या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्याची जबाबदारी सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यावर आहे. भारतीय क्रिडा मंत्रालयाने ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे.

केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकुर यांनी अक्षयला नामांकित केले आहे. अक्षयने देखील त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत अनुराग ठाकुर यांच्यासह क्रिडा मंत्रालयाचे आभार मानले. तसेच ऑलम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना हटके शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी ‘भारताचा विजय भारताच्या हातात आहे’ असे म्हणत अक्षयने व्हिडीओची समाप्ती केली.

टोकियो ऑलिम्पिक 2020 भारतासाठी खास का?

भारताच्या दृष्टीकोनातून यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा फार विशेष मानली जात आहे. यावेळी भारताच्या इतिहासातील सर्वाधिक 125 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. यातील अनेक खेळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय खेळाडू त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत. भारत प्रथमच फेंसिंग आणि घोडेस्वारी या दोन खेळांमध्ये सहभाग नोंदवणार आहे. तसेच पहिल्यांदाच भारतातील तीन जलतरणपटू जलतरण तलावात आपलं कौशल्य दाखवतील. विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक नेमबाजांचा समावेश आहे. त्यामुळे बॉक्सिंगपासून कुस्ती आणि बॅडमिंटनपर्यंत देशाचे नाव उंचवण्यासाठी प्रयत्न करतील.

तसेच हॉकी या खेळासाठीही भारतीय महिला आणि पुरुष असे दोन्ही गटात संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय इतिहासातील सर्वाधिक पदकांची अपेक्षा देशाला आहे. त्यामुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा खास मानली जातं आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : पुरुष तिरंदाजीचा रँकिंग राऊंडमध्ये सुमार कामगिरी, मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये ही नुकसान

Tokyo Olympics 2020 : पाच वर्षांची प्रतीक्षा संपली, आज स्पर्धेचं उद्घाटन, भारतीय खेळाडू इतिहास रचण्यास सज्ज

Olympic Games 2032 : ऑलम्पिक गेम्स 2032 साठी ‘या’ देशाची निवड, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा निर्णय

(Bollywood Superstar Akshay Kumar is cheering for team india officially for Tokyo Olympic 2021)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.