CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स आधी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिला बॉक्सरचा मोठा आरोप
CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स असो, ऑलिम्पिक किंवा आशियाई स्पर्धा, प्रत्येक वेळी या मोठ्या स्पर्धांच्या आधी भारतीय खेळाडूंशी संबंधित काही ना काही वाद समोर येतात.
मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स असो, ऑलिम्पिक किंवा आशियाई स्पर्धा, प्रत्येक वेळी या मोठ्या स्पर्धांच्या आधी भारतीय खेळाडूंशी संबंधित काही ना काही वाद समोर येतात. बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) आधी सुद्धा परिस्थिती बदललेली नाही. डोपिंगची भिती आहेत. ऑलिम्पिक पदक विजेती आणि बॉक्सिंग मधील भारताचं आशास्थान लवलीना बोरगोहेनने (lovlina borgohain) गंभीर आरोप केला आहे. राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला असून मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप लवलीना बोरगोहेनने केला आहे. मागच्यावर्षी टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo olympics) स्पर्धेत लवलीना बोरगोहेनने कास्यंपदक विजेती कामगिरी केली होती. सोमवारी 25 जुलैला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. 28 जुलैला गेम्स सुरु होण्याच्याआधी लवलीनाच्या कोच संध्या गुरुंग यांना न सांगता हटवण्यात आलं. अखेरीस त्यांचा समावेश करण्यात आला, पण आता त्यांना क्रीडा गावात प्रवेश मिळत नाहीय. ज्याचा परिणाम आपल्या तयारीवर होतोय, लवलीना बोरगोहेनने म्हटलं आहे.
मानसिक छळ होत असल्याचा आरोप
लवलीनाने टि्वटरच्या माध्यमातून तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. ऑलिम्पिक मध्ये मदत करणाऱ्या कोचेसना हटवून तयारीमध्ये अडथळा आणला जातो. असा आरोप लवलीनाने केला आहे. “आज मी मोठ्या दु:खी अंतकरणाने सांगतेय की, माझ्या बरोबर मानसिक छळ होतोय. मला ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना प्रत्येकवेळी हटवलं जातं. माझ्या ट्रेनिंग प्रोसेसना प्रभावित केलं जातं” असं लवलीनाने म्हटलं आहे.
Olympic medallist boxer Lovlina Borgohain alleges mental harassment, says, “training stopped 8 days before Commonwealth Games” pic.twitter.com/z9gkeQnHpm
— ANI (@ANI) July 25, 2022
कोच बदलल्याने ट्रेनिंगवर परिणाम
“लवलीनाने ज्या संध्या गुरुंग यांचा उल्लेख केलाय, त्या टोक्यो ऑलिम्पिक मध्ये तिच्यासोबत होत्या. कोच संध्या गुरुंगजी यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंग कॅम्प मध्ये हजारवेळा हात जोडल्यानंतर उशिराने समाविष्ट केलं जातं. त्यामुळे ट्रेनिंग मध्ये मला अडचणी येतात. मानसिक त्रास होतो” असं लवलीना बोरगोहेनने सांगितलं.