Tokyo Olympics वर कोरोनाचे सावट, प्रेक्षकांच्या अनुपस्थित स्पर्धा?
जपानमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे त्याठिकाणी ऑलम्पिकचे आयोजन नेमके कसे असेल याबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. दरम्यान आता सामने प्रेक्षकांविना आयोजित करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
टोक्यो : जपानमधील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटामुळे यंदा टोक्योमध्ये होणाऱ्या ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जपानचे वृत्तपत्र ‘द असाही’ यांनी ही माहिती दिली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे जपानमध्ये आपात्कालीन परिस्थिती असून पुन्हा काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. या परिस्थितीचा विचार करता टोक्यो ऑलम्पिक पार पाडण्यासाठी प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा विचार असल्याती माहिती समोर येत आहे. (Due to Covid Situation in Japan Tokyo Olympic 2020 May held withhout Spectators as Tokyo declares Coronavirus Emergency says Report)
ऑलम्पिक स्पर्धा सुरु होणार असल्याने पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी जपानमध्ये निर्बंधाची घोषणार करण्यात आली. तज्ज्ञ मंडळीच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकारिऱ्यांंनी 22 ऑगस्टपर्यंत जपानमध्ये आपातकाल लागू केला आहे.
शुक्रवारी होणार अंतिम निर्णय
कोरोना महामारीमुळे मागील वर्षी स्थगित केलेली ऑलम्पिक स्पर्धा यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान पार पडणार आहे. यावेळी परदेशी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नसून आता स्थानिक प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबतच्या निर्णयावर शुक्रवारी स्थानीक आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितिसह अन्य प्रतिनिधी महत्त्वाची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत.
टॉर्च रिलेही थांबवण्यात आली
कोरोनाच्या संकटामुळे टोक्योच्या सार्वजनिक ठिकाणांवर सुरु असलेली ऑलम्पिक टॉर्च रिले ही थांबवण्यात आली आहे. टोक्योत मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑलम्पिक खेळांतून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने टॉर्च रिले सार्वजनिक ठिकाणी समाप्त करण्याचा निर्णय घेतला. जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार टोक्योच्या खाजकी फ्लेम लाइटिंग समारंभात टॉर्च रिलेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
हे ही वाचा :
Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा
Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस
(Due to Covid Situation in Japan Tokyo Olympic 2020 May held withhout Spectators as Tokyo declares Coronavirus Emergency says Report)