Tokyo Olympics मध्ये भारतीय महिला गॉल्फरची वर्णी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं ऑलम्पिकचं तिकीट
देशभरातून विविध खेळांसाठी अव्वल दर्जाच्या खेळाडूंना भारत ऑलम्पिकसाठी पाठवत आहे. दरम्यान गॉल्फ स्पर्धेसाठी भारताची आघाडीची गॉल्फर अदिती अशोक हिला संधी मिळाली आहे. अदिती सलग दुसऱ्या वर्षी ऑलम्पिकमध्ये खेळणार आहे.
नवी दिल्ली : भारताची आघाडीची गॉल्फर अदिती अशोकने (Aditi Ashok) सलग दुसऱ्या वर्षी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला आहे. जागतिक क्रमवारीत 45 वे स्थान मिळवत अदितीने टोक्यो ऑलम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीट मिळवलं आहे. याआधी 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्येही अदितीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर आता पुन्हा यंदाही तिला हा सन्मान मिळाल्याने तिच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा भारतीय जनता करत आहे. (Female Indian Golfer Aditi Ashok Selected For Tokyo Olympics)
पुरुष गॉल्फर अर्निबान लाहिरी (Anirban Lahiri) यांच्यानंतर भारताची अव्वल दर्जाची गॉल्फर म्हणून अदितीकडे पाहिले जाते. 1904 नंतर 2016 पर्यंत भारताच्या महिला गोल्फरला ऑलम्पिकसाठी पात्र होता आलं नव्हतं. दरम्यान अदितीने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्र होत भारताला सन्मान मिळवून दिला होता. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा अदिती ऑलिम्पिकसाठी पात्र झाली आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या आठवणी अजूनही ताज्या
अदितीने पात्र झाल्यानंतर आपला आनंद जाहिर करताना एक ट्विट केलं. त्यात तिने लिहिलं की, ”मला अजूनही रिओ ऑलिम्पिक कालच झाल्यासारखी वाटते. भारतासाठी खेळनं एक सन्मानाची गोष्ट आहे. मला पुन्हा ही संधी मिळाली आहे.”
I still think of @Rio2016 like it was only yesterday. To have the honour of playing for India @OlympicGolf @Tokyo2020 is beyond exciting. I’m privileged to have the opportunity to represent my country & my sport at the games again.#Tokyo2020 #OlympicGolf ??⛳️??♀️ ? @GettyImages pic.twitter.com/rVN0Tu1ckD
— Aditi Ashok (@aditigolf) June 29, 2021
अर्निबान लाहिरीही ऑलिम्पिकसाठी पात्र
भारतीय पुरुष गॉल्फर अनिर्बान लाहिरी याने देखील सलग दुसऱ्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा सन्मान मिळवला आहे. मागील आठवड्यात जाहिर केलेल्या भारतीय गोल्फर्सच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने त्याला ही संधी मिळाली आहे. जागतिह क्रमवारी 340 व्या स्थानावर असणारा अर्निबान भारताकडून अव्वल स्थानी असून ऑलम्पिकमध्ये भारताला एक स्थान मिळणार असल्याने अर्निबान याची वर्णी लागली आहे.
हे ही वाचा :
Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस
Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग
(Female Indian Golfer Aditi Ashok Selected For Tokyo Olympics)