Tokyo Paralympics: भारताची निराशाजनक सुरुवात, टेबल-टेनिसमध्ये अपयश, सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवल्यानंतर आजपासून भारताचे टोक्यो पॅरालिम्पिक्समधील सामने सुरु झाले आहेत. पण पहिल्या दिवशीच्या सामन्यातच भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. त्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympics 2020) उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. आजपासून भारतीय खेळाडूंच्या स्पर्धांना सुरुवात देखील झाली. पण सलामीच्या सामन्यातच भारताच्या टेबल टेनिसपटू सोनलबेन मनुभाई पटेल आणि भाविनाबेन पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सोनलबेन पटेल टेबल टेनिसच्या क्लास थ्री कॅटेगरीमध्ये सहभागी झाली होती. तिचा पहिला सामना चीनच्या लि क्वानविरुद्ध होता. तर दुसरीकडे भाविनाबेन पटेलचा पहिला सामनाही क्लास चार कॅटेगरीमध्ये चीनच्या जु वाईविरुद्ध होता.
सोनलबेनची झुंज अपयशी
सोनलबेनने सामन्या सुरुवातीला चांगली आघाडी मिळवली होती. पहिल्या तीन गेमनंतर ती सामन्यात आघाडीवर होती. पण त्यानंतर ती सामन्यात मागे पडू लागली आपली लीड कायम ठेवता न आल्याने अखेर तिला हा रोमहर्षक सामना 3-2 च्या फरकाने गमवावा लागला. पाच गेम चाललेल्या सामन्यात चीनच्या खेळाडूने 11-9,3-11,15-17,11-7,11-4 च्या फरकाने विजय मिळवला.
खूब लड़ी वो…
Sonal Patel, in her debut match, was full of grit and determination!
She fought bravely against 2-time Paralympic medallist opponent from China, Li Qian.
Li Qian wins 3-2!
Final score: 11-9, 3-11, 17-15, 7-11, 4-11.#Paralympics https://t.co/7iMu2P4BL3
— ALL INDIA RADIO आकाशवाणी (@AkashvaniAIR) August 25, 2021
भाविनाही पहिल्या सामन्यात पराभूत
सोनलबेन प्रमाणे भाविनाबेन देखील आपल्या पहिल्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पराभूत झाली. ती सामन्यात सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. त्यामुळे तिला 11-3,11-9,11-2 अशा सरळ तीन सेट्समध्ये पराभव पत्करत सामना गमवावा लागला. त्यामुळे भारताचा पॅरालिम्पिकमधील पहिला दिवस निराशाजनक ठरला.
.@BhavinaPatel6 put up a good fight against ??’s Y Zhou but goes down 0-3 in her first group match.
Bhavina to play her next group match tomorrow.
Let’s continue to cheer for her!#Cheer4India #Praise4Para #Paralympics
— ALL INDIA RADIO आकाशवाणी (@AkashvaniAIR) August 25, 2021
इतर बातम्या
(First day at tokyo paralympics indias table tennis player sonalben patel and bhavina patel lost their first matches)