Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस
जगभरातील सर्व खेळाडूंसाठी सर्वात मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोक्यो येथे पार पडणार आहेत. दरम्यान भारत ही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरणार असतानाच भारताची आघाडीची धावपटू हीमा दास दुखापतीमुळे स्पर्धा खेळू शकणार नाही.
नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ऑलम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics ) यंदा जपानच्या टोक्यो शहरात पार पडणार आहेत. जगभरातील देशांचे या स्पर्धेत भाग घेत घेऊन जास्तीत जास्त पदकं मिळवण्याचं स्वप्न असतं. दरम्यान भारतही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेत उतरणार आहे. दरम्यान महिला धावपटूंमध्ये हिमा दास (Hima Das) नाही तर दुती चंद (Dutee Chand) पात्र ठरली आहे. दुतीने धावपूटंच्या जागतिक क्रमवारीच्या मदतीने ऑलम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. दुतीने 100 मीटर आणि 200 मीटर दोन्ही स्पर्धांच तिकिट मिळवलं आहे. ऑलम्पिकसाठी पात्र होण्याची तारीख 29 जून ठरवण्यात आली होती त्यानंतर धावपूटंच्या जागतिक क्रमवारीच्या आधारे खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पात्रता देण्यात आली. (For Tokyo Olympics 2020 Dutee Chand Qualifiy Instead of Hima das Through World Rankings)
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतल्यानंतरही दुतीला क्वालीफाईंगसाठी आवश्यक वेळ मिळवता येत नव्हती. जागतिक क्रमवारीच्या आधारे तिला ऑलम्पिकसाठी पात्रता देण्यात आली. नुकतीच तिने इंटर-स्टेट मीटमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पार केली होती मात्र क्वालीफाइंग मार्क 11.15 सेकेंद असल्याने 2 सेंकदानी ती मागे राहिली होती.
दुतीची खेल रत्नसाठीही शिफारस
देशातील खेळाडूंसाठी सर्वांत मानाचा पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) भारतीय एथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव सूचवले आहे. त्यामुळे एकीकडे टोक्यो ऑलम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासह खेल रत्न पुरस्कारासाठी शिफासर झाल्याने दुतीसाठी दोन आनंदाच्या बातम्या एकाच वेळी आल्या आहेत.
हिमा दास नाही करु शकली क्वॉलीफाय
टोक्यो ऑलम्पिकसाठी भारताकडून धावपटू हिमा दासवर बऱ्याच आशा होत्या. मात्र हिमा पटियाला येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय अंतर-राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मांसपेशींमध्ये ताण पडल्याने दुखापतग्रस्त झाली. त्यामुळे तिला ऑलम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही.
हे ही वाचा :
Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत
Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग
(For Tokyo Olympics 2020 Dutee Chand Qualifiy Instead of Hima das Through World Rankings)