Tokyo Olympics 2021: पंचाचा एक निर्णय आणि आंदोलनाला बसला बॉक्सर, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

टोक्यो ओलिम्पिकमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंगच्या या सामन्यात काही असं घडलं की पंच आणि खेळाडू हैरान झाले. सामनाही मध्येच थांबवावा लागला.

Tokyo Olympics 2021: पंचाचा एक निर्णय आणि आंदोलनाला बसला बॉक्सर, वाचा काय आहे नेमकं प्रकरण
माउराद एलिव
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 3:07 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) फ्रान्सचा सुपर हेवीवेट बॉक्सरला क्वॉर्टर फायनलमध्ये सामन्यातून बाद करताच थेट रिंगजवळच जवळपास एक तास तो विरोध प्रदर्शन दर्शवत बसून होता. त्याला मुद्दामून प्रतिस्पर्धी खेळाडूला डोक्यावर मारण्याच्या कारणाने बाद करण्यात आलं होतं. रविवारी झालेल्या दुसऱ्या फेरीतील या सामन्यात केवळ चार सेकंद बाकी असताना पंच एंडी मुस्थाचिहियो याने फ्रान्सचा बॉक्सर माउराद एलिव (Mourad Aliev) याला बाद घोषित केलं. पंचाच्या मते एलिवने मुद्दामून प्रतिस्पर्धी ब्रिटिश बॉक्सर फ्रेजर क्लार्कच्या डोक्यावर मारलं होतं.

पंचाने निर्णय घोषित करताच एलिव बॉक्सिंग रिंगजवळीत शिड्यांवर बसला. फ्रान्स संघाचे अधिकारी देखील पाणी घेऊन  एलिवशी बोलायला आले. तेव्हा त्याने अनुवादकाकडून बोलताना सांगितले की,“मी अशाप्रकारे रिंगजवळ बसून पंचाचा निर्णय़ चूकीचा असल्याचं सांगयचा प्रयत्न करत होतो. मी प्रामाणिकपणे चूकीच्या गोष्टीविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो.  या चूकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराची मेहनत वाया जाईल.” 30 मिनिटाहून अधिक काळ एलिव त्याठिकाणी बसल्यानंतर ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी एलिवसह फ्रान्स टीमशी बोलले. त्यानंतर एलिवने प्रोटेस्ट थांबवल. तो म्हणाला, ”मी हा सामना जिंकू शकलो असतो. पण मला बाद घोषित करण्यात आल्यामुळे माझी संधी हुकली. मी संपूर्ण आयुष्य यासाठी तयारी केली होती. त्यामुळे राग येणं स्वाभाविक आहे.”

चुरशीचा झाला सामना

एलिव आणि क्लार्क यांच्यातील सामना चांगलाच अटीतटीचा झाला. एलिव सुरुवातीपासून चांगला खेळत होता. पण अखेर बाद झाल्याने क्लार्कचं पदक पक्कं झालं. यावेळी क्लार्क म्हटला, “मला एलिवने मुद्दाम मारलं की नाही हे मला माहित नाही. मी सामन्यानंतर त्याला भेटून शांत राहण्यासही सांगितलं.”  एलिवने पहिला राउंड 3-2 जिंकला होता. पण नंतर त्याला बाद घोषित करण्यात आल्याने तो पराभूत झाला.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ओलिम्पिकच्या क्वॉर्टर फायनलमध्ये मिळवली जागा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूला पदक मिळवण्याची शेवटची संधी, असे असेल आव्हान

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

(France boxer mourad aliev sit on protest against referee decision at tokyo olympics)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.