Tokyo Paralympics मध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर भाविनावर बक्षिसांचा वर्षाव, गुजरात सरकारकडून तगडा ‘इनाम’
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक पटकावून देणाऱ्या भाविनावर बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. भाविनाने टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत रौप्य पदक मात्र मिळावले आहे.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) चंदेरी कामगिरी करत रौप्य पदकाला गवासणी घातली आहे. भारताला स्पर्धेत पहिलं वहिलं पदक मिळालं असून सर्व भारतीय सध्या आनंदात आहेत. भाविनाने देशाला रौैप्य मिळवून दिलं असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला आहे. दरम्यान सध्या भाविनावर बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला आहे.
गुजरातच्या मैहसाणा जिल्ह्यात एक छोटं दुकान चालवणारे हसमुखभाई पटेल यांची मुलगी भाविना यंदा पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावले अशी आशा खूपच कमी होती. याआधी तिने इतका अप्रतिम खेळ कधीच दाखवला नव्हता. पॅरालिम्पिकमध्ये तिने पहिला सामना पराभूत झाली होती. पण नंतर मात्र तिने एका पाठोपाठ एक असे सर्व सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली. भाविनाच्या विजयामुळे सर्वच भारतीय आनंदी असून खासकरुन तिचं राज्य असणाऱ्या गुजरातमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
गुजरात सरकारकडून बक्षिसाची घोषणा
गुजरात सरकार त्यांची स्टार टेबल टेनिसपटू भाविनाचा सन्मान करण्याची कोणतीच संधी सोडू इच्छित नाही. ती भारतात परतण्यापूर्वीच सरकारने बक्षिसाची घोषणा केली आहे. सरकारने भाविनाला तब्बल तीन कोटी रुपयांच रोख बक्षिस जाहीर केलं आहे. तसंच भाविनाला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही केली आहे. भाविनाने तिच्या आयुष्यात पैशासह नोकरीसाठी फार संघर्ष केला आहे. पण आता हा संघर्ष संपला असून भाविनाच्या घरचेही खूप आनंदी झाले आहेत. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीही भाविनाला पदक जिकल्यानंतर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,‘भाविनाबेनने टोक्यो 2020 पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. गुजरात सरकार भाविनाला बक्षिस म्हणून तीन कोटी रुपये देणार आहे.’
CM Shri @vijayrupanibjp announces a cash prize of ₹ 3 crore for Bhavina Patel, a para-paddler from Mehsana district, under the State Govt’s ‘Divyang Khel Ratna Protsahan Puraskar Yojana’ for her historic achievement at the #TokyoParalympics
— CMO Gujarat (@CMOGuj) August 29, 2021
कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना
भाविना पटेलने रौप्य पदक जिंकताच तिच्या घरातल्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब गरबा करुन आनंद व्यक्त करत आहे. तर संपूर्ण परिसरात मिठाई देखील वाटली जात आहे. भाविनाचे कुटुंबिय गरबा खेळत असलेला व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
#WATCH Family members and friends of Para-paddler Bhavina Patel in Mehsana perform ‘garba’ to celebrate her bringing home a Silver medal in her maiden Paralympic Games pic.twitter.com/h55CAAycOG
— ANI (@ANI) August 29, 2021
हे ही वाचा :
(Gujrat government announces prize money for bhavina patel for winnig silver medal in tokyo paralympics)