Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेच्या राउड 16 मध्ये विजय मिळवल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. तिरंदाज दीपिका आणि प्रवीणची जोडी पराभूत झाली आहे.

Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 1:14 PM

Tokyo Olympics 20-2021 : तिरंदाजीच्या (Archery) मिक्स्ड टीम प्रकारात (Mixed Doubles)  भारताच्या मेडल मिळवण्याच्या आशा मावळल्या आहेत. भारताची दीपिका कुमारी (Deepika Kumari) आणि प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत (Quarter Final) कोरियाच्या तिरंदाजाकडूम पराभूत झाली असल्याने स्पर्धेबाहेर गेली आहे. ज्यामुळे भारताच्या या प्रकारातील पदकाच्या आशाही संपल्या आहेत.

कोरियाच्या (Korea) तिरंदाजानी भारतीय जोडीला  6-2 च्या फरकाने नमवत स्पर्धेबाहेर केलं आहे. आधी राउंड ऑफ 16 मध्ये भारतीय जोडीने चीनी ताइपेच्या जोडवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर दुसरीकडे बांग्लादेशी जोडीला पराभूत करुन उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या कोरियाच्या तिरंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड मिळवली होती. आधी 4-2 ची आघाडी घेतल्यानतंर सामन्याच्या उत्तरार्धातही कमालीचं प्रदर्शन कायम ठेवत कोरियाने भारताला नमवत पुढील फेरी गाठली.

भारतचा नवा प्रयोग ‘फेल’

यावेळी पहिल्यांदाच दीपिका आणि प्रवीणची जोडी एकत्र मैदानावर उतरली होती. याआधी प्रत्येक इव्हेंटमध्ये दीपिका ही तिचा नवरा आणि भारतीय तिरंदा अतानुसोबतच स्पर्धेत उतरत होती. मात्र टोक्यो ऑलम्पिक्समध्ये पुरुष राउंडमध्ये प्रवीणने अतानुपेक्षा चांगली कामगिरी केल्याने त्याला दीपिकाचा जोडीदार म्हणून मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये उतरवण्यात आलं. पण भारताचा हा प्रयोग फेल ठरल्याने उपांत्यपूर्व फेरीत दीपिका आणि प्रवीणला पराभव स्वीकारावा लागला.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(In Archery mixed event indian archer duo deepika kumari and pravin jadhav lost in Quarter final)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.