Olympic Games 2032 : ऑलम्पिक गेम्स 2032 साठी ‘या’ देशाची निवड, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा निर्णय

टोक्यो ऑलम्पिकला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेवर अनेक संकट येत आहेत. दरम्यान 2032 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्यात येणारे ठिकाण आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक कमिटीने जाहीर केले आहे.

Olympic Games 2032 : ऑलम्पिक गेम्स 2032 साठी 'या' देशाची निवड, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा निर्णय
Brisbane will host 2032 olympic Games
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 5:54 PM

टोक्यो : यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धांना सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. टोक्यो येथे 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) मागील वर्षी कोरोनामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलया होत्या. यंदा जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOC) मिळून या स्पर्धा सर्व काळजी घेऊन खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 2032 साली ऑलम्पिक खेळवण्यात येणारा देश फायनल करण्यात आला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने याबाबतची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन (Brisbane) शहराला 2032 च्या ऑलम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान देण्यात आला आहे. हा मान ब्रिस्बेनला मिळणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. पण बुधवार समितीने दिलेल्या निर्णयात यावर शिक्कामोर्तब झाले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसमध्ये दिलेल्या माहितीत म्हटलं, ‘आम्हाल याआधी ऑलम्पिक खेळ कसे खेळवायचे, कसं आयोजन करायचं याचा अनुभव आहे. 2024 मध्ये पॅरिस आणि  2028 मध्ये लॉस एंजेलीसमध्ये ऑलम्पिक खेळ होणार आहेत. त्यानंतर 2032 साठी ब्रिसबेनने नव्या बिडिंग सिस्टममध्ये विजय मिळवला.  त्यामुळे हा मान आम्हाला मिळाला आहे.”

तिसऱ्यांदा मिळाला मान

ऑलम्पिक सारखी भव्य स्पर्धा खेळवण्याचा मान ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा मिळाला आहे. याआधी 1956 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे ऑलम्पिक खेळ खेळवण्यात आले होते. तर त्यानंतर 2000 साली सिडनी येथे ऑलम्पिक खेळांचे आयोजन झाले होते. त्यानंतर आता 32 वर्षांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हा मान मिळाला आहे.

ब्रिसबेनमध्ये उत्सव साजरा

2032 च्या ऑलम्पिक खेळांसाठी ब्रिसबेनचे नाव घोषित करताच तेथील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी जल्लोष करत फटाके फोडले. यावेळी ब्रिसबेनमधील नागरिकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता.

हे ही वाचा :

Tokyo Olympics : ‘या’ दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा, टोक्योत आतापर्यंत 6 ऑलम्पिक खेळाडू संक्रमित

Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

(In Australias Brisbane will Host 2032 Olympic Games say IOC)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.