Tokyo Paralympics 2020: भारतीय बॅडमिंटनपटूंची कमाल, सलग तिसरं पदक, सुहास यथिराजसह कृष्णा नागरचंही रौप्य पदक निश्चित
बॅडमिंटनपटू सुहास यथिराज पाठोपाठ पुरुषांच्या एकेरी बॅटमिंटन स्पर्धेत भारताचा कृष्णा नागरही सेमीफायनलच्या सामन्यात विजय मिळवत फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे त्यानेही किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.
Tokyo Paralympics : भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. भारताने सलग तिसरं पदक जवळपसा मिळवलं असून हे यश पॅरा एथलिट कृष्णा नागरने (Krishna Nagar) मिळवलं आहे. त्याने सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला नमवत फायनल गाठली आहे. त्यामुळे आता कृष्णाचं किमान रौैप्य पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकाची आशाही निर्माण झाली आहे.
कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक टाकलं आहे. 22 वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने 21-10 ने तर दुसरा 21-11 ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.
A commanding display from @Krishnanagar99 ?
Through to the Men’s Singles SH6 #gold medal match, winning 21-10, 21-11 against #GBR‘s Krysten Coombs! #ParaBadminton #Tokyo2020 #Paralympics pic.twitter.com/b73D3cB5uF
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 4, 2021
कृष्णाला मेहनतीचं फळ
SH6 गटा ज्या खेळाडूंची उंची वाढलेली नसते असे खेळाडू सहभाग घेतात. कृष्णाला आपल्या या आजाराबाबत तो दोन वर्षांचा असताना कळाले. त्यानंतर त्याने संपूर्णपणे खेळासाठी स्वत:ला समर्पित केलं. तो दररोज घरापासून 13 किमी लांब स्टेडियममध्ये जाऊन सराव करत. इतक्या मेहनतीनंतर त्याने आज हे यश मिळवलं आहे. दरम्यान फायनलच्या सामन्यात हाँगकाँगच्या चू मान काईला नमवून सुवर्णपदक मिळवण्याची संधी कृष्णाला आहे. हा सामना रविवारी पार पडेल.
हे ही वाचा –
(In Badmintons Mens Single Krishna Nagar Won semi final match and enetrs in final with securing silver medal)