Tokyo Olympics 2020 स्पर्धेपूर्वीच जपानवासी आक्रमक, स्पर्धेच्या आयोजनाविरोधात नारे देत दर्शवला विरोध, ‘या’ आहेत मागण्या
जपानमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे ऑलम्पिकचे सामने प्रेक्षकांविना आयोजित करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान तरी हे खेळ सध्यातरी घेऊ नयेत यासाठी काही स्थानिक आंदोलन करुन नारेबाजी करत आहेत.
टोक्यो : जपानच्या टोक्यो शहरात 23 जुलै पासून ‘टोक्यो ऑलम्पिक स्पर्धांना’ (Tokyo Olympic Games) सुरुवात होत आहे. पण या स्पर्धा पार पाडण्यासाठी जपानच्या सरकारसह आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अजूनही या अडचणी संपलेल्या नाहीत. मागील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. आता त्या जुलै 23 पासून सुरु होणार आहेत. पण त्यापूर्वीच काही स्थानिकांनी या स्पर्धांविरोधात नारेबाजी करुन विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. शनिवार जवळपास 40 आंदोलनकर्ते टोक्यो ऑलम्पिक रद्द करण्यासाठी ‘Go Home (घरी जा)’ असे नारे लगावत होते. (In Japan Some Protesters gave Slogan against Tokyo Olympics 2020)
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितिचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाक थांबलेल्या पंचतारांकीत हॉटेलाबाहेर काही आंदोलनकर्त्यांनी जमा होत नारेबाजी केली. ‘इथे ऑलम्पिक होणार नाही’ असे नारे यावेळी लावले जात होते. यावेळी 38 वर्षी अवाके योशिदा जिने कोविड-19 मुळे आपली नोकरी गमावली तीही या आंदोलनकर्त्यांत जमा होती. ती म्हणाली, ”अशा महामारीमध्ये ऑलम्पिकचे आयोजन करने आणि त्यासाठी निर्बंध वाढवणे चूकीचे आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल.” जपानमध्ये कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे ऑलम्पिक संपेपर्यंत कोरोना प्रादुर्भाव थांबवण्याकरता अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे आणखी बेरोजगारी वाढेल त्यामुळे या स्पर्धांचे आयोजन आता रद्द करावे अशी मागणी आंदोलरकर्त्यांनी केली आहे.
टॉर्च रिलेही थांबवण्यात आली
कोरोनाच्या संकटामुळे टोक्योच्या सार्वजनिक ठिकाणांवर सुरु असलेली ऑलम्पिक टॉर्च रिले ही थांबवण्यात आली आहे. टोक्योत मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑलम्पिक खेळांतून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने टॉर्च रिले सार्वजनिक ठिकाणी समाप्त करण्याचा निर्णय घेतला. जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार टोक्योच्या खाजकी फ्लेम लाइटिंग समारंभात टॉर्च रिलेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
ऑलम्पिक स्पर्धांना सततचा विरोध
याप्रकारे ऑलम्पिकच्या आयोजनासाठी विरोध होण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही जपानच्या नागरिकांनी ऑलम्पिक खेळांना विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाइन सर्वेमध्ये जवळपास 80 टक्के नागरिकांनी ऑलम्पिक स्पर्धांच्या आयोजनाला विरोध दर्शवला होता. देशातील डॉक्टरांनी देखील या स्पर्धेबाबत नाराजी दर्शवली होती जपानचे ऑनलाइन रिटेलर राकुटेन ग्रुपचे संस्थापक हिरोशी मिकितानी ( Hiroshi Mikitani) यांनी या आयोजनाला विरोध केला होता. त्यांनी या खेळांचा ‘सुसाइड मिशन’ असा उल्लेख केला होता.
इतर बातम्या
Tokyo Olympics 2020 स्पर्धा प्रेक्षकांविना; जपानी सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय
Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा
(In Japan Some Protesters gave Slogan against Tokyo Olympics 2020)