Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतातील अनेक खेळाडू ऑलम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. मात्र ध्वजवाहक हा महत्त्वाचा मान एका महिला आणि एका पुरुष खेळाडूला देण्यात आला आहे.

Tokyo Olympics मध्ये 'या' दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती
Olympic Flag bearers
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 7:07 PM

टोक्यो : कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये पार पडणारी टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) स्थगित करण्यात आली होती. आता मात्र जपान सरकार, आयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ऑलम्पिक यंदा घेण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी देखील झाली असून भारतानेही आपल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. दरम्यान ऑलम्पिकच्या उद्घाटनावेळी ध्वजवाहकाचा मान दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम (MC Marykom) आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) यांना देण्यात आला आहे. (In Tokyo Olympics 2020 Boxer Mary Kom and Hocky Player Manpreet Singh Will Be Indias Flag Bearers At Opening Ceremony)

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) दिलेल्या माहितीत कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Puniya) याला देखील 8 ऑगस्ट रोजी टोक्यो ऑलम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे. IOA अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी एका आधिकारिक पत्राद्वारे ही माहिती दिली.

पहिल्यांदाच एक नाही दोन ध्वजवाहक

ऑलम्पिकच्या इतिहासात यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असतील.  नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली.  2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून एकमात्र व्यक्तिगत ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) याला मान देण्यात आला होता.

भारतासाठी ऑलम्पिक पदक मिळवणारी पहिली महिला

दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला आहे. 2012 साली मेरीने ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. 38 वर्षीय मेरीने आतापर्यंत भारताना अनेक पदकं मिळवून दिली असून तिचे वय पाहता ही तिची शेवटची ऑलम्पिक स्पर्धा असू शकते. त्यामुळे ती यंदा पदक मिळवण्यासाठी जीवाचं रान करणार हे नक्की.

हे ही वाचा :

Tokyo Olympics वर कोरोनाचे सावट कायम, सर्बियाचा कोरोनाबाधित खेळाडू जपानमध्ये, विमानतळावरुनच थेट विलगीकरणात

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

Tokyo Olympics साठी हिमा दास नाही, तर ‘ही’ भारतीय धावपटू पात्र, खेल रत्न पुरस्कारासाठीही शिफारस

(In Tokyo Olympics 2020 Boxer Mary Kom and Hocky Player Manpreet Singh Will Be Indias Flag Bearers At Opening Ceremony)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.