Tokyo Olympics 2021 : ‘या’ भारतीय खेळाडूकडून पदक मिळवण्याच्या सर्वाधिक आशा, प्रसिद्ध टाईम मासिकाच्या खास यादीत उल्लेख
भारताता 19 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी (Saurabh Chaudhary) ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देईल अशी आशा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्याने 2018 आशियाई खेळांसह कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं.
मुंबई : टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेसाठी यंदा भारत 126 खेळाडू पाठवत आहे. आतापर्यंत कोणत्याही ऑलम्पिक स्पर्धेला भारताने पाठवलेल्या खेळाडूंच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. त्यामुळे भारताला यंदा पदक मिळण्याच्या आशाही अधिक आहेत. भारताचे सर्वच खेळाडू अव्वल दर्जाचे आहेत. मात्र 19 वर्षीय सौरभ चौधरी (Saurabh Chaudhary) हा भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचं प्रसिद्ध टाईम मासिकानं (Time Magzine) म्हटलं आहे. (In Tokyo olympics 2021 Saurabh chaudhary Have most chances of Grabing Medal Says Time Magazine)
2018 मधील आशियाई खेळांत (Asian Games) आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज सौरभ चौधरी टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympic) सज्ज झाला आहे. दरम्यान टाइम मासिकानं जगातील 48 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. ज्यांच्यावर यंदाच्या ऑलम्पिकमध्ये सर्वांचीच नजर असले. हे खेळाडू पदकाचे प्रबळ दावेदार असणार असून भारताकडून एकमेव सौरभ चौधरी याच नाव या यादीत सामिल आहे. या यादीतील एकमेव भारतीयासह तो एकमेव नेमबाज देखील आहे. सौरभ सध्या क्रोएशिया येथे टोक्यो ऑलम्पिकती तयारी करतो आहे. 16 जुलैला तो टोक्योला पोहोचणार आहे. सौरभ 10 मीटर एयर पिस्तल आणि 10 मीटर एयर पिस्टल मिश्र स्पर्धेत सहभागी होणार आहे.
काय लिहिलंय टाइम मासिकात?
टाइम मासिकात सौरभबद्दल लिहिले आहे की, ”19 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी टोक्योमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवू शकणारा सर्वात प्रबळ दावेदार आहे. त्याने 2015 मध्ये नेमबाजी सुरू केली असली तरी त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 सुवर्ण आणि 6 रौपदकं पटकावली आहेत. 2018 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो सर्वात युवा भारतीय नेमबाजही होता.’
हे ही वाचा :
(In Tokyo olympics 2021 Saurabh chaudhary Have most chances of Grabing Medal Says Time Magazine)