Tokyo Paralympics मध्ये भारताची उंच उडी, एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!
भारतीय खेळाडूंनी टोक्यो पॅरालिम्पिकमधील धमाकेदार प्रदर्शन सुरुच ठेवलं आहे. नुकतंच उंच उडी स्पर्धेत मरियप्पन थंगावेलु (Mariyappan Thangavelu)आणि शरद कुमारने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
Tokyo Paralympics 2020: भारताची टोक्यो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympic 2020) शानदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत आठ पदकं पटकावलेल्या भारतीय खेळाडूंनी आता एकाच खेळात दोन पदकं खिशात घातली आहेत. उंच उडी स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावत भारताने रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. यामध्ये मरियप्पन थंगावेलुने रौप्य (mariyappan thangavelu won silver) तर शरद कुमारने कांस्य (sharad kumar won Bronze) मिळवलं आहे.
यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दोघांनी उंच उडीच्या T63 स्पर्धेत हे य़श मिळवलं आहे. थंगावेलुने रिओ पॅरालिम्पिकनंतर सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलं आहे. तर रिओमध्ये कांस्य जिंकणारा वरुण सिंह भाटी यंदा पदक जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.
अशी झाली स्पर्धा
भारताच्या शरद कुमारने सुरुवातीलाच आघाडी घेत 1.83 मीटरची उंच उडी घेतली. त्यानंतर तो 1.86 मीटरची उडी घेण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला. त्यामुळे केवळ भारताच्या मरियप्पन आणि अमेरिकेच्या ग्रीव सॅम यांच्यात 1.86 मीटरचा मार्क गाठण्याची स्पर्धा होती. मरियप्पन तिन्ही प्रयत्नात 1.86 मीटरचा मार्क गाठू शकला नाही. पण अमेरिकेच्या ग्रीवने तिसऱ्या प्रयत्नात मार्क गाठला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. ज्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर असेलल्या मरियप्पनला रौप्य आणि शरदला कांस्य मिळालं.
Mariyappan wins SILVER?for India ?? !!!
This is his 2nd consecutive #Paralympics medal, historic in so many ways!
Well Played Champion! @189thangavelu#Tokyo2020#Cheer4India #Praise4Para pic.twitter.com/bTnHqIPQr3
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 31, 2021
#Athletics It’s another #Bronze for #IND for Sharad Kumar in High Jump T63 Final #Paralympics #Tokyo2020 pic.twitter.com/pU3W19oD2m
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 31, 2021
भारताच्या खिशात 10 पदकं
भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. आता उंच उडीमध्ये मरियप्पन थंगावेलु आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिल्यामुळे भारताकडे दोन पदकं वाढली आहेत. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 10 पदकं झाली आहेत.
हे ही वाचा
Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक
Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
(In tokyo paralympics High Jump India won two medal as mariyappan thangavelu holds silver and sharad kumar got bronze)