VIDEO : Tokyo Paralympics मध्ये भारताला सुवर्णपदक, सुमितने फोडली डरकाळी, हाच तो विक्रमी थ्रो
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवल्यानंतर आथा पॅरालिम्पिक खेळातही सुमित अंतिलने सुवर्णपदक मिळवून देत भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला आहे.
Tokyo Paralympics 2020: नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक जिंकवून दिलं होतं. या पदकाची चमक डोळ्यांसमोर असतानाच टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारताचा पॅरा एथलीट भालाफेकपटू सुमित अंतिलने (Sumit Antil) पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. यंदाच्या पॅरालिम्पिकमधील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असून सर्व देशभरातून सुमितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुमितने अगदी जोशमध्ये येत केलेल्या थ्रोने फक्त सुवर्णपदकच नाही मिळवून दिलं तर एक नवा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. सुमितचा सहा पैकी पाचव्या प्रयत्नातील 68.55 मीटरचा थ्रो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या थ्रोनंतर सुमितने अगदी सिंहासारखी फोडलेली डरकाळी खरच पाहण्याजोगी होती. तर त्याने फोडलेली ही डरकाळी आणि त्याचा विजयी थ्रो तुम्हीही पाहा…
A new world record 68.55.#SumitAntil congratulations for #GoldMedal #gold #Olympics pic.twitter.com/jixjPj6X5x
— Desi ?? (@pockingliberals) August 30, 2021
मोदींसह अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सुमीतच्या या सुवर्ण कामगिरीनंतर देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेकांनी सुमितला ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Our athletes continue to shine at the #Paralympics! The nation is proud of Sumit Antil’s record-breaking performance in the Paralympics. Congratulations Sumit for winning the prestigious Gold medal. Wishing you all the best for the future.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
The World Record has been broken !
India ?? has won another GOLD? MEDAL !
Sumit Antil congratulations on a splendid ? at #Tokyo2020 #Paralympics
Incredible throw, Inspirational feat !
• Javelin Throw F64 Final with a throw of 68.55m#Praise4Para #Cheer4India pic.twitter.com/zdDbDnIUxs
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 30, 2021
असे होते सुमितचे थ्रो
सुमितने या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळेस स्वत:चेच वर्ल्ड रेकॉर्ड तोडले. स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो सुमितने 66.95 मीटर लांब फेकला. या थ्रोसह त्याने 2019 मध्ये दुबईत बनवलेले स्वत:चे रेकॉर्ड तोडले. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला ज्यानंतर तिसरे आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. पण पाचव्या प्रयत्नात अप्रतिम असा 68.55 मीटरचा थ्रो करत त्याने सुवर्णपदकाला गवासणी घातली. सोबतच एक नवं वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.
संबंधित बातम्या
Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक
Tokyo Paralympics : भारताची पदकांची लयलूट, नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेकीत रौप्य, भालाफेकीतही दोन पदकं!
Tokyo Paralympics 2020 : भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन केलं कौतुक
(In Tokyo Paralympics Mens Javelin Throw Sumit Antil wons gold medal with setting world record)