Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ

भारताला टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये एक मोठा झटका बसला आहे. भारताचं एक पदक कमी झालं आहे. काही तांत्रिक समस्यांमुळे थाळीफेकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या विनोद कुमारला ते परत द्यावे लागणार आहे.

Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ
विनोद कुमार
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 12:14 PM

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल (रविवारी) थाळीफेक स्पर्धेत भारताच्या विनोद कुमारने (Vinod Kumar) जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे. त्याला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये ‘अयोग्य’ ठरवण्यात आला आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘पॅनल भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारला पॅरालिम्पिकमध्ये त्याच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या F52 थाळीफेक स्पर्धेत अयोग्य मानण्यात आले आहे. त्यामुळे त्याने जिंकलेले पदकही अयोग्य म्हणून करार दिले जात आहे.’  विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे तिसरं स्थान मिळवलं होतं. पण इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला संबधित श्रेणीत समाविष्ट करण्यावर काही प्रश्न उचलले. ज्यामुळे त्याचं पदक होल्डवर ठेवण्यात आले होते. ज्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पदक वितरणादरम्यान हे पदक बाद म्हणून घोषित करण्यात आलं.

काय आहेत नियम आणि F52 स्पर्धा?

विनोद कुमार असलेल्या F52 स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्या मांसपेशींमध्ये कमजोर असते. त्यांना अधिक हालचाली करता येत नाही. तसंच काहींच्या हातात, पायातही विकार असतो. तसंच ज्याच्या मणक्यात त्रास असतो, त्याचा एखादा शरीराचा भाग तुटलेला असतो असे खेळाडूही यामध्ये सहभाग घेतात. वर्गीकरणादरम्यान खेळाडूंना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यांचा आजार किंवा त्रास एकसारखा असतो ते निवडण्याची संधी मिळते. याच दरम्यान विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचलले, ज्यामुळे चौकशीनंतर विनोदचं पदक अयोग्य ठरवण्यात आलं.

भारताचं एक पदक कमी

भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली होती. ज्यात एका सुवर्णपदकासह चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश होता. पण विनोद कुमारचं पदक बाद करार देण्यात आल्याने आता भारताकडे एक कांस्य पदक कमी करुन एकूण 6 पदकं आहे. पदक टॅलीमध्ये भारत 26 व्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या  

Tokyo Paralympics : भारताची पदकांची लयलूट, नेमबाजीत सुवर्ण, थाळीफेकीत रौप्य, भालाफेकीतही दोन पदकं!

Tokyo Paralympics 2020 : भारताच्या अवनी लेखराचा सुवर्णवेध, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन केलं कौतुक

(In tokyo Paralympics vinod kumar loses bronze declared ineligible in classification reassessment)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.