Tokyo Olympics 2021 : भारताची ऑलिम्पिकमधील विक्रमी कामगिरी, अमेरिका आणि चीनचा दबदबा, कुणाला किती पदकं?
भारताने याआधी 2012 साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये 6 पदकं जिंकत विक्रमी कामगिरी केली होती. यंदा मात्र 7 पदकं जिंकत भारताने स्वत:चाच विक्रम तोडला आहे.
Tokyo Olympics 2021 : भारतासाठी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरलेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympic 2020) आज अखेर संपली (Tokyo Olympics Closing Ceremony). शनिवारचा दिवस भारतासाठी अत्यंत अप्रतिम ठरला. भालाफेक खेळात भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. ओलिम्पिकमध्ये भारताला 12 वर्षानंतर सुवर्णपदक मिळालं. तर एथलेटिक्स खेळात 100 वर्षांगहून अधिक काळानंतर पहिल्यांदा भारताला सुवर्णपदक मिळालं. विशेष म्हणजे भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये 6 पदक जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली.
भारताने यंदा जिंकलेल्या 7 पदकांत 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं. भारत टोक्यो ओलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्याच्या रेसमध्ये 48 व्या क्रमांकावर राहिला.
भारताचे सात पदक विजेते
टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.
टॉपवर अमेरिका
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्यात सर्वात वरच्या स्थानी अमेरिका आहे. त्यांनी 39 गोल्ड, 41 रौप्य आणि 33 कांस्य पदकं जिंकली. त्यांची एकूण पदक संख्या 113 आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनअसून त्यांनी एकूण 88 पदकं जिंकली. ज्यात 38 सुवर्ण, 32 रौप्य आणि 18 कांस्य पदकं आहेत. यानंतर यजमान संघ जपान तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 27 सुवर्ण, 14 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह एकूण 58 पदकं खिशात घातली.
इतर बातम्या
Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(India made medals record at Tokyo Olympic know total medal tally at Tokyo olympics 2021)