Tokyo Olympics 2021: प्रवीण जाधव दुसऱ्या सामन्यात पराभूत, ऑलिम्पिकमधील यात्रा समाप्त

तिरंदाजीच्या पुरुष एकरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला जगातील नंबर 1 च्या ब्राडीने त्याला पराभूत केले.

Tokyo Olympics 2021: प्रवीण जाधव दुसऱ्या सामन्यात पराभूत, ऑलिम्पिकमधील यात्रा समाप्त
प्रवीण जाधव
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 1:47 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारतासाठी पुरुष एकेरीत खेळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र तिरंदाज प्रवीण जाधव (Pravin Jadhav)  याने आज चांगली सुरुवात करत पहिला सामना 6-0 च्या फरकाने जिंकला. त्याने जगातील नंबर 2 चा खेळाडू असणाऱ्या आरओसी संघाच्या गालसन बाजारझापोव याला मात देत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र जगातील नंबर एकचा तिरंदाज असणाऱ्या अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने जाधवला नमवत स्पर्धेबाहेर केलं.

पहिल्या सेटपासूनच ब्राडीने सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या सेटमध्ये ब्राडीने 28 गुण मिळवले. तर जाधव 27 गुण मिळवल्याने पिछाडीवर पडला. ज्यामुळे सामन्यात ब्राडीने 2-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ब्राडीने 27 गुण मिळवले तर जाधव 26 गुणच मिळवू शकला. त्यानंतर अखेरच्या निर्णायक सेटमध्ये ब्राडीने 26 आणि जाधवने 23 गुण मिळवल्याने अखेर सामन्यात जाधव 6-0 ने पराभूत झाला. या पराभावासह जाधवची यंदाच्या ऑलिम्पिकमधील यात्राही संपली आहे.

आधी अॅथलिटिक्स मग तिरंदाजी

प्रवीणचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच सर्वांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेल्या प्रवीणने मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पकमध्ये पात्रता मिळवली. ऑलिम्पकसाठी येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रवीणला शुभेच्छा देताना त्याच्या प्रवासाबद्दल विचारलं होतं. तेव्हा प्रवीण आधी अॅथलिटिक्स करायचा असा खुलासा त्याने केला होता. त्याचं सुरुवातीला राज्य पातळीवर अॅथलिटिक्स स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण त्याची प्रकृती अॅथलिटिक्ससाठी योग्य नसल्याने त्याला त्याच्या प्रशिक्षकाने वेगळा कोणतातरी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रवीणने तिरंदाजीचा सराव सुरु केला.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं

(Indian archer pravin Jadhav lost second match and out of tokyo Olympics)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.