Tokyo Olympics 2021: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, 6-0 ने सामना जिंकत पुढच्या फेरीत दाखल
तिरंदाजीच्या पुरुष एकरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने पहिल्याच सामन्यात तगड्या प्रतिस्पर्धी खेळाडूला तगजी मात देत पुढची फेरी गाठली आहे.
Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) आजच्या (28 जुलै) दिवसाची सुरुवात जरी भारतीय महिला हॉकी संघाच्या पराभवाने झाली असली तरी नंतरच्या काही स्पर्धांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. आधी पीव्ही सिंधूने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला सरळ सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. हा सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासोबतच तिने बाद फेरीत जागाही मिळवली. त्यापाठोपाठ आता भारतासाठी पुरुष एकेरीत खेळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र तिरंदाज प्रवीण जाधव (Pravin Jadhav) देखील सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
प्रवीणने जगातील नंबर 2 चा खेळाडू असणाऱ्या आरओसी संघाच्या गालसन बाजारझापोव याला 6-0 ने तगडी मात देत विजय मिळवला. प्रवीणने पहिल्या सेटमध्ये 29 गुण मिळवले. तर गालसान 27 गुणच मिळवू शकला. प्रवीणने दुसऱ्या सेटमध्ये गलासानवर दबाव कायम ठेवला. गलासानने 27 गुण मिळवताच प्रवीणने 28 गुण मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये जाधव पुन्हा एकदा 9-9-10 च्या फरकाने 27 अंक मिळवून यशस्वी ठरला. त्याने सामना 6-0 च्या फरकाने खिशात घातला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery Men’s Individual 1/32 Eliminations Results@pravinarcher makes his way into the 1/16 Elimination Round as he shoots past Galsan Bazarzhapov. #WayToGo champ ????#RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/YB6hpgWcdT
— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2021
पुढील सामना अमेरिकेशी
या विजयासह प्रवीणने स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे. आधी मिश्र गटात दीपिका कुमारीसोबत मिळून खेळलेल्या सामन्यात प्रवीणला पराभव पत्करावा लागला होता. मात्र पुरुष एकेरीमध्ये त्याने विजयाने सुरुवात केली आहे. या विजयासह तो दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. आता दुसऱ्या फेरीत त्याचा सामना अमेरिकेच्या एलिसन ब्राडी सोबत असेल. ब्राडी इरानच्या खेळाडूला पराभूत करुन दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल
(Indian archer pravin Jadhav won First match at tokyo Olympics)