Tokyo Paralympics: तिरंदाज राकेश कुमारचा अप्रतिम खेळ सुरुच, ज्योति बालियानसह मिश्र स्पर्धेत गाठली उपांत्यपूर्व फेरी
भारताची तिरंदाज जोडी राकेश कुमार आणि ज्योति बालियानने थायलंडच्या खेळाडूंना 147-141 च्या फरकाने मात देत उपांत्य पूर्व फेरीमध्ये जागा पक्की केली आहे.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo paralympics) भारताचा तिरंदाज राकेश कुमारने (Rakesh Kumar) वैयक्तीक खेळातील अप्रतिम कामगिरी नंतर मिश्र गटातही उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. त्याने ज्योति बालियानसह (Jyoti Baliyan) मिळून थायलंडच्या जोडीला मात देत की जोड़ी को मात देत उपांत्य पूर्व फेरीमध्ये जागा पक्की केली आहे.
राकेश कुमार यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. राकेशने आतापर्यंत शानदार प्रदर्शन करत पॅरालिम्पिक खेळांमध्ये पुरुष वैयक्तिक स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीमध्ये जागा मिळवली आहे. दुसरीकडे तिरंदाज श्याम सुंदर स्वामी हा दुसऱ्या फेरीतून बाहेर गेला आहे. पात्रता फेरीत 720 पैकी 699 गुण मिळवत 36 वर्षीय राकेशने शनिवारी हाँगकाँगच्या चुएन एंगाइ ला 13 गुणांनी पराभूत केलं.
Quarter-Final bound ?#IND‘s #ParaArchery Mixed Team of Jyoti Balyan & Rakesh Kumar win 147-141 against #THA duo Praphaporn Homjanthuek & Anon Aungaphinan to progress to the quarter-finals!
Watch out for the duo as they play later today ?#Tokyo2020 #Paralympics
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 29, 2021
थायलंड जोडीला नमवत भारत उपांत्य पूर्व फेरीत
उपांत्य पूर्व फेरीत प्रवेशासाठी भारत आणि थायलंड या देशांतील तिरंदाजामध्य सामना होता. सामन्यात पहिल्या राऊंडमध्ये दोन्ही टीम बरोबरीवर होत्या. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये थायलंडच्या जोडीने 37-36 ने राऊंड जिकंला. तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र भारताने 38-36 ची आघाडी घेतली. शेवटच्या राऊंडमध्ये थायलंडची जोडी आणखी तणावाखाली गेल्याने केवळ 33 गुण मिळवून शकली तर भारताने मात्र 37 गुण मिळवत राऊंड जिंकला. ज्यानंतर दोघांपैकी परफेक्ट 10 स्कोर अधिकदा केल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आलं.
हे ही वाचा :
(Indian archer rakesh kumar and jyoti baliyan into the quarter finals in mixed event at tokyo paralympics 2020)