Tokyo Olympic 2021 : पदक तर जिंकलं पण संवेदनशीलताही जपली, कर्णधार मनप्रीतकडून कांस्य पदक कोविड योद्ध्यांना समर्पित

भारतीय पुरुष हॉकी संघाने शानदार खेळ करत कांस्य पदक खिशात घातलं आहे. जर्मनी विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात भारताने 5-4 ने विजय मिळवला आहे.

Tokyo Olympic 2021 : पदक तर जिंकलं पण संवेदनशीलताही जपली, कर्णधार मनप्रीतकडून कांस्य पदक कोविड योद्ध्यांना समर्पित
मनप्रीत सिंग
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 12:44 PM

Tokyo Olympic 2021 : यंदा भारताला पदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनी संघाला 5-4 ने नमवत (India vs Germany) कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे. यावेळीच कर्णधार मनप्रीत सिंगने (Manpreet singh) आणखी एक वाखाणण्याजोगी कृती करत हे पदक कोविड योद्ध्यांना (Covid Warriors) समर्पित केल्याची प्रतिक्रिया केली. आनंदाच्या, जल्लोषाच्या वातावरणातही संवदेनशीलता जपत सिंगने ही प्रतिक्रिया दिली.

एकेकाळी ऑलिम्पिक खेळांच्या हॉकी स्पर्धांवर भारतीय पुरुषांचे एकहाती वर्चस्व होते. सलग काही वर्षे सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाला 1980 नंतर मात्र एकही पदक पटकावता आले नाही. सेमीफायनलपर्यंत देखील धडक न मारता आल्याने हॉकी संघ गेल्या 41 वर्षांपासून पदकाची वाट पाहत होता. पण यंदा भारतीय संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये थोडक्यात पराभव झालेल्या भारतीयांनी तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात कोणतीच चूक न करता जर्मनीला नमवत कांस्य पदक जिंकलं.

मोदींकडूनही कर्णधार मनप्रतीचं कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विजयानंतर भारतीय हॉकी संघातील खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कर्णधार मनप्रीतचं विशेष कौैतुक करत ‘तू इतिहास लिहिलास’ अशा शब्दात त्याचं कौतुक केलं. तसेच बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर शांत झालेला मनप्रीत आज मात्र जोशपूर्ण दिसून आला असंही मोदी यांनी नमूद केलं. त्यांनी इतर खेळाडूंशी देखील बातचीत करत त्यांचही अभिनंदन केलं.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीवर 5-4 ने मात, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! 

Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

(Indian Hockey team captain manpreet singh dedicates bronze medal to covid warriors)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.