भारतीय हॉकी संघातील ‘द वॉल’चा सन्मान, केरळ सरकारकडून बक्षिस, 2 कोटींची रोख रक्कम जाहीर

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांचा दुष्काळ संपवत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं. या विजयानंतर प्रत्येक खेळाडूचा त्याच्या राज्यसरकारने सन्मान केल्यानंतर केरळ सरकारनेही आपल्या खेळाडूला बक्षिस जाहीर केले आहे.

भारतीय हॉकी संघातील 'द वॉल'चा सन्मान, केरळ सरकारकडून बक्षिस, 2 कोटींची रोख रक्कम जाहीर
भारतीय संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवत इतिहास रचला
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 2:50 PM

कोची : भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही पुन्हा जोमाने उठत तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरले. या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत होता. देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच संघातील खेळाडूंना त्यांच्या राज्य सरकारनेही बक्षिसं जाहीर केली.

आधी पंजाब सरकारने त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंना 1 कोटी रुपयांचं रोख बक्षिस जाहीर केलं. त्यानंतर ओडीसा सरकारने ही त्यांच्या संघातील दोन खेळाडूंना प्रत्येकी 2.50 कोटींचे बक्षिस दिले. दरम्यान संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या गोलकिपर पी आर श्रीजेश (pr sreejesh) याला मात्र त्याच्या केरळ राज्याकडून एक धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असं बक्षिस देणार असल्याची बातमी समोर आली होती. यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता मात्र केरळ सरकारने श्रीजेशला दोन कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. तसेच श्रीजेशला बढती देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. श्रीजेश सध्या सार्वजनिक शिक्षण विभागामध्ये उपनिर्देशक म्हणून कार्यरत होता. आता त्याला बढती देऊन सहाय्यक निर्देशक करण्यात येणार आहे.

श्रीजेश ठरला विजयाचा शिल्पकार

संपूर्ण टोक्यो ओलिम्पिकमध्ये श्रीजेशने अनेक गोल अडवले आहेत. गोलकीपर पीआर श्रीजेशने क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ब्रिटेन विरुद्ध केलेल्या शानदार गोलकिंपिंगमुळे तो सामना जिंकण्यात भारताला यश आलं. आज जर्मनी विरुद्ध देखील त्याने तब्बल 9 शानदार सेव्ह केल्या. कांस्य पदकासाठीच्या भारत आणि जर्मनी यांच्यातील सामन्या दरम्यानही शेवटच्या मिनिटांत जर्मनीला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. जर्मनीने हा गोल करताच त्यांनी सामन्यात बरोबरी साधली असती. पण याच वेळी श्रीजेशने अप्रतिम सेव्ह करत भारताचा विजय पक्का केला.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीवर 5-4 ने मात, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! 

Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

(Indian Hockey team goalkeeper pr sreejesh Got reward of 2 crores from keral government)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.