Tokyo Olympic 2021 : भारतीय हॉकी संघाच्या 9 धुरंदरांनी दागले 23 गोल, रचला इतिहास, मिळवले कांस्यपदक

भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर देशाच्या राष्ट्रीय खेळात पदक मिळवून दिलं आहे. या विजयासाठी ऑलिम्पिक सारख्या महान स्पर्धेत भारतीय संघाने तब्बल 23 दागले आहेत.

Tokyo Olympic 2021 : भारतीय हॉकी संघाच्या 9 धुरंदरांनी दागले 23 गोल, रचला इतिहास, मिळवले कांस्यपदक
भारतीय हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 2:24 PM

Tokyo Olympic 2021 : टोक्योतील  एस्ट्रो टर्फवर भारताने इतिहास रचत 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकलं. या एका पदकाने कोट्यवधी भारतीयांना आनंद दिला आहे. हा आनंद मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील (Indian Men’s Hockey Team) सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी केली. पण संघातील 9 धुरंदर फॉरवर्ड खेळाडूंनी दागलेले 23 गोल भारतीय प्रेक्षक कधीच विसरु शकत नाही. 1980 च्या मास्को ओलिम्पिकनंतर भारताने पहिल्यांदाच हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे.

संपूर्ण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेल 23 गोलच विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले. या 23 गोलमधील 13 गोल ग्रुप स्टेजमधील 5 सामन्यात ठोकले. त्याच्या जोरावरच 5 पैकी 4 सामने भारत जिंकला. ज्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये भारताने 10 गोल केले. भारताकडून हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक गोल दागले.

9 धुरंदर, 23 गोल

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताकडून गोल करण्यात सर्वात मोठं योगदान दिलं ते हरमनप्रीत सिंगने. त्याने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल केले. संघाने केलेल्या 23 गोलमधील अर्धा डजन गोल एकट्या हरमनप्रीतने केले. त्याने स्पर्धेत तब्बल 6 गोल केले. हरमनप्रीत पाठोपाठ रूपिंदर पाल सिंगने ज्याला भारताचा ड्रॅग फ्लिक स्पेशलिस्ट म्हटलं जात, त्यानेही स्पर्धेत 4 गोल केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिमरनजीत असून त्याने स्पर्धेत 3 गोल केले. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर दिलप्रीत, हार्दिक आणि गुरजंत हे तिघे असून त्यांनी प्रत्येकी 2-2 गोल करत संघाला योगदान दिलं. यांच्याशिवाय कर्णधार मनप्रीत सिंग, विवेक प्रसाद आणि वरूण कुमारनेही 1-1 केला.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीवर 5-4 ने मात, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! 

Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

(Indian Hockey team won bronze after scoring 23 goals in tokyo Olympic)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.