Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

ग्रुप स्टेजमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक सामना पराभूत झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. ग्रेट ब्रिटनला 3-1 ने नमवत भारताने इतिहास रचला आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
भारतीय हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:13 PM

Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे. कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 49 वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघांनं अखेरचं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळच्या ऑलम्पिकमध्ये हॉकी खेळात 6 संघ असल्यानं राऊंड रॉबिन नंतर पहिल्या दोन संघात फायनल झाली होती.  आज झालेल्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने नमवत भारतीय संघाने हे यश मिळवलं आहे. आता विश्व चॅम्पियन असणाऱ्या बेल्जियम संघासोबत भारतीय संघ भिडणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये 1-7 ने पराभव मिळवल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत सलग 4 सामने जिंकत सेमीफायनमध्ये जागा मिळवली आहे. सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्येच आघाडी घेत  ब्रिटनला मागे टाकलं. ज्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सामना खिशात घातला.

पहिल्या हाफमध्ये 2-0 ची आघाडी

पहिल्या हाफमध्ये भारताने आक्रमक खेळ दाखवला.  टीम इंडियाने दोन्ही क्वॉर्टरमध्ये एक-एक गोल केला. आधी 7 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 16 व्या मिनिटाला गुरजंत सिंगने आणखी एक गोल करत 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरच्या अंती भारत 2-0 च्या आघाडीवर होता.

ब्रिटेनचे पुनरागमन, पण भारतच विजयी

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी चुरशीची टक्कर दिली. ब्रिटन संघाकडून आक्रमण झाली पण भारतीय डिफेन्सने तगडा खेळ दाखवला. ब्रिटेनने 3 पेनल्टी कॉर्नर घेतले ज्यात एक प्रयत्न यशस्वी झाल्याने त्यांनी 2-1 ने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र भारताने एकही संधी दिली नाही. उलट 57 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने एक गोल करत भारताला 3-1 ची विजयी आघाडी मिळवून दिली. या विजयासह 1980 नंतर प्रथमच भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक, भारताची आणखी एका पदकाची कमाई

ऑलिम्किमधून परतल्यावर लवलीनाला आसाम सरकारकडून खास गिफ्ट, गावकरीही होणार आनंदी

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

(Indian Hocky team defeated Great britan with 3-1 and enters in semi final after 40 years)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.