Tokyo Olympics 2021: भारतीय हॉकी संघाला कांस्य पदकाची आशा, असे असेल आव्हान
41 वर्षानंतर सुवर्णपदकाच्या अत्यंत जवळ गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमने 5-2 च्या फरकाने पराभूत केलं. पण तिसऱ्या स्थानासाठीचे भारताचे आव्हान अजूनही कायम आहे.
Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Mens hockey team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. बेल्जियम संघाने 5-2 ने मात दिल्याने भारताचे सुवर्णपदकासह किमान रौैप्यपदक मिळवण्याचे स्वप्नही तुटले. पण या निराशेनंतर एक शेवटचा आशेचा किरण म्हणजे कांस्य पदक. भारतीय पुरुष संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचल्याने त्यांना कांस्य पदक मिळण्याची शक्यता असून त्यासाठी केवळ एक मिळवणे गरजेचे आहे.
भारतीय संघाचा कांस्य पदकासाठीचा सामना जर्मनी संघासोबत असेल. भारत आणि बेल्जिय यांच्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने जर्मनीला 3-1 नमवत फायनलमध्ये जागा मिळवली. त्यामुळे कांस्य पदकासाठी जर्मनी दावेदार असून त्यासाठी त्यांना भारतासोबत दोन हात करावे लागणार आहेत. हा सामना गुरुवारी 5 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता खेळवला जाईल.
We go again for Bronze in our last match of the Tokyo Olympics against Germany on 5th August 2021 at 07:00 AM IST. ?#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/oqbrYJmTEo
— Hockey India (@TheHockeyIndia) August 3, 2021
11 मिनिटांत भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या
भारत आणि बेल्जियम सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत बेल्जियम संघाने गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली होती. पण भारताच्या मनदीप सिंगने 11 व्या मिनिटाला तर हरमनप्रीत सिंगने 8 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. काही काळ आघाडीवर असलेल्या भारताने आणखी एक गोल खाल्ला आणि सामन्यात 2-2 असा स्कोर झाला. 49 व्या मिनिटापर्यंत असाच स्कोर होता. भारतीय संघाने तगडी टक्कर देत बेल्जियमला पुढे जाऊ दिले नाही. पण त्यानंतर शेवटच्या 11 मिनिटात सर्व बाजी पलटली. 49 व्या आणि 53 व्या मिनिटाला बेल्जियमच्या अलेक्सांद्र हेंड्रिक्सने गोल करत भारताला दोन गोलने मागे टाकलं. त्यानंतर मात्र भारताला आघाडी घेता आली नाही. उलट शेवटच्या मिनिटाला बेल्जियमच्या जॉन डोहमेनने आणखी एक गोल करत 5-2 ने भारतीय संघाचा पराभव केला.
हे ही वाचा
Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…
Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत
(Indian mens hockey team will play against germany for bronze medal at tokyo olympics)