VIDEO : नीरज चोप्रा एक त्याची रुपं अनेक, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरीनंतर जाहिरातीत दाखवला जलवा, अभिनय पाहून चकित व्हाल!

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने ऑगस्टमध्ये टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर आता नीरज पुन्हा एकदा एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे.

VIDEO : नीरज चोप्रा एक त्याची रुपं अनेक, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरीनंतर जाहिरातीत दाखवला जलवा, अभिनय पाहून चकित व्हाल!
नीरज चोप्रा
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 6:53 PM

मुंबई:  7 ऑगस्ट, 2021 रोजी भारतात अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत सर्वत्र एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून महिन्याहून अधिकचा काळ लोटला. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. त्यातच नीरजने एका नव्या जाहिरातीत केलेल्या अभिनयाने तर त्याला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.

नीरजने सुवर्णपदक मिळवल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. अनेकजण नीरजला आपल्या कंपनीचा चेहरा बनवण्यासाठी उत्सुक आहेत. याच संकल्पनेला धरुन क्रेडिट कार्डच बील भरण्यासाठी उपयोगी असणाऱ्या ‘क्रेड’ (CRED) या अॅपने त्यांच्या जाहिरातीत नीरजकडून अभिनय करवून घेतला आहे. मागील वर्षीपासून बाजारात आलेल्या या अॅपमध्ये अनेक खेळाडू तसेच अभिनेते काम करत असतात. त्यातच आता नीरजने देखील या अॅपच्या जाहिरातीत काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ही जाहिरात प्रदर्शित झाली असून नीरजने स्वत:ही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये नीरज स्वत: वेगवेगळ्या रुपात दिसत असून समाजातील अनेक जण नीरजच्या यशाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन घेण्याचा वापर कशाप्रकारे करत आहेत. ते दिसून येत आहे.

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Indian Olympic Gold medalist neeraj chopra actiing in cred ad video went viral)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.