Tokyo Paralympics 2020 : भारतासाठी निराशाजनक दिवस, एका मागोमाग एक पराभव, थोडक्यात निसटली पदकं

टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये (Tokyo Paralympics) मंगळवारची (31 ऑगस्ट) सुरुवात चांगली झालेली नाही. भारतीय खेळाडू पदकं जिंकण्याची आशा असणाऱ्या काही सामन्यात पराभूत झाले आहेत.

Tokyo Paralympics 2020 : भारतासाठी निराशाजनक दिवस, एका मागोमाग एक पराभव, थोडक्यात निसटली पदकं
राकेश कुमार
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:44 AM

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंसाठी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) आजचा दिवस (31 ऑगस्ट) निराशाजनक जात आहे. सकाळपासून एका पाठोपाठ एक खेळामध्ये भारताचे पदकाचे प्रबळ दावेदार पराभूत होत आहेत. भारताला यंदाच्या पॅरालिम्पिक्समध्ये पहिलं पदक मिळवून देणारी  भाविना पटेल (Bhavina Patel) महिला दुहेरीच्या स्पर्धेत सोनल पटेलसोबत पराभूत झाली असून  निशानेबाज रुबिना फ्रान्सिस आणि तिरंदाज राकेश कुमार (Rakesh Kumar) ही पराभूत झाले आहेत.

आतापर्यंत केवळ भारतीय पुरुष निशानेबाजांनी ugR. 10 मीटर एअर पिस्टल SH1 मध्ये  फायनलपर्यंत घडक घेतली आहे. मनीष नरवाल पात्रता फेरीत अव्वल स्थनावर होता. त्याने सहज फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर मनीषसोबत राज सिंह पदकासाठी फायनलमध्ये खेळतील.

भाविना आणि सोनल पटेलचा पराभव

टेबल टेनिसमध्ये भारताला ऐतिहासिक कामगिरी करत पदक मिळवून देणारी भाविना पटेल महिला दुहेरी फेरीत पहिल्याच सामन्यात पराभूत झाली आहे. सोनल पटेलसोबत क्लास 4 आणि क्लास 3 च्या महिला दुहेरी स्पर्धेत भारताच्या या जोडीला चीनच्या टेबल टेनिसपटूंनी पराभूत केलंय. या सामन्यात 11-2, 11-4, 11-2 अशा तगड्या फरकाने भारतीय जोडी पराभूत झाली. विशेष म्हणजे हा सामना जिंकल्यास दोघींत किमान कांस्य पदक निश्चित झालं असतं.

सातव्या स्थानावर रुबिना फ्रान्सिस

भारताची निशानेबाज रुबिना फ्रान्सिस  महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 च्या फायनलमध्ये  सातव्या स्थानावर राहिली. रूबिनाने असाका शूटिंग रेंजमध्ये फायनलमध्ये 128.1 गुण मिळवले. एसएच1 वर्गात निशानेबाज केवळ एका हाताने पिस्टल पकडतात. त्यांच्या एका हातात किंवा पायात विकार असतो. दरम्यान या स्पर्धेत इरानची सारेह जवानमार्दी 239.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी झाली.

उपांत्य पूर्व फेरीत राकेश कुमार पराभूत

राकेश कुमार पॅरालिम्पिक खेळांत तिरंदाजीतील पुरुष व्यक्तिगत कंपाउंच्डया उपांत्य पूर्व फेरीत चीनच्या के अल झिनलियांगविरुद्ध अगदी 143-145 अशा छोट्याशा फरकाने पराभूत झाला.  राकेश पहले सेटमध्ये 29-30 ने मागे पडलेला. पण पुन्हा त्याने पुनरागमन करत उत्तम खेळ दाखवला पण अखेर तो पराभूत झाला.

हे ही वाचा

Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक

Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

(Indian para atheletes Today at tokyo paralympics 2020 loosing one by one match)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.