Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

परिस्थिती कायम तशीच राहत नाही तुमची मेहनत आणि जिद्द तिला बदलण्यास भाग पाडते. याचेच एक उत्तम उदाहरण भारताच्या या धावपटूने जगासमोर ठेवले आहे.

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार
रेवती वीरामनी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 6:48 PM

नवी दिल्ली : अवघ्या 5 वर्षाची असताना अनाथ झालेली रेवती वीरामनी (Revathi Veeramani) हिला मजदूर म्हणून काम करणाऱ्या आजीने सांभाळलं. सुरुवातीला सराव करताना पायात शूजतर सोडा चप्पलही नसायचं आणि अशा कठीण परिस्थितीवर मात करत रेवती आता भारताकडून जगातील सर्वांत महान स्पर्धा असणाऱ्या ऑलम्पिकमध्ये खेळणार आहे. तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील सकीमंगलम या गावातील 23 वर्षीय रेवती 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या  टोक्यो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2021) भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. रेवती भारताच्या चार गुणा 400 मीटर मिश्रित रिले टीममध्ये आहे. (Indian Sprinter Revathi Veeramani Orphaned at age of 5 Now Playing For India in Tokyo Olympic 2020)

रेवतीने ज्या कठीण परिस्थितीचा सामना केला आहे त्याबद्दल पीटीआयशी बोलताना तिने सांगितले की,”मला सांगण्यात आलं होतं की माझ्या वडिलांना पोटाचा काहीतरी त्रास असल्याने त्यांचे निधन झाले आणि सहा महिन्यानंतर तापामुळे आईचेही निधन झाले. त्यानंतर मला आणि बहिणीला माझी आज्जी अराम्मल हिने सांभाळलं. तिला त्यासाठी वीटभट्टीवर मजूरी करावी लागत. तिला नातेवाईकांनी आम्हाला शाळेला पाठवू नको असे सांगितल्यावरही तिने कोणाचेही न ऐकता आम्हाला शिकवले.’’  रेवती आणि तिच्या बहिणीला 76 वर्षीय आजीने शिकवल्यामुळे त्या दोघीही आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकल्या. आता ऑलम्पिक खेळण्यासाठी जाणारी रेवती भारतीय रेल्वेमध्ये टीटीईची नोकरी देखील करते. तर तिची छोटी बहिन चेन्नई पोलिसांत अधिकारी आहे.

कॉलेजमध्ये विनाचप्पल करायची सराव

रेवतीने कॉलेजमध्ये सराव करतानाच्या आठवणींबद्दल सांगितले की, ‘माझ्या आजीने खूप मेहनत करुन आम्हाला सांभाळले. तसेच माझे गुरुजी कन्नन सर यांनी खेळामध्ये माझे करीयर करण्यास मदत केली. मी कॉलेजच्या स्पर्धांमध्ये विनाचप्पल भाग घेतला होता. तसेच 2016 च्या कोयंबत्तूर राष्ट्रीय ज्यूनियर चॅम्पियनशिपमध्येही माझ्याकजडे शूज नव्हते. त्यानंतर कन्नन सरांनी मला मदत करुन योग्य त्या सोयीसुविधा पुरवल्या ज्यामुळे मी माझ्या खेळांत आणखी यशस्वी होऊ शकले.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 साठी रवाना होणाऱ्या भारताच्या शिलेदारांना क्रिकेटपटूंच्या शुभेच्छा, मोदींच्या cheer4india ला साद

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

(Indian Sprinter Revathi Veeramani Orphaned at age of 5 Now Playing For India in Tokyo Olympic 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.