Tokyo Olympics 2021: निराशाजनक! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत, पहिल्याच फेरीत पराभवाने स्पर्धेबाहेर

टेनिस महिला डबल्स स्पर्धेत भारताला पहिल्या डावातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे त्या पहिल्या सामन्यातच स्पर्धेबाहेर गेल्या आहेत.

Tokyo Olympics 2021: निराशाजनक! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत, पहिल्याच फेरीत पराभवाने स्पर्धेबाहेर
सानिया मिर्झा
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:03 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पदक जिंकवून देण्यासाठी एक प्रबळ दावेदार असणारी टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ही अंकिता रैनासोबत (Ankita Raina) मिळून महिला डबल्सच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. भारताच्या या जोडीला टेनिस (Tennis) खेळाच्या महिला डबल्समध्ये युक्रेनच्या (Ukraine) महिला जोडीने दारुण पराभूत केले.

सानिया आणि अंकिता यांनी सामन्याची सुरुवात जोरदार केली. दोघींनी पहिला सेट 6-0 च्या फरकाने जिंकला. पण त्यानंतर पुढील दोन सेट गमावले. पहिला सेट जिंकणारी ही जोडी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये 6-7(0) 8-10 च्या फरकाने पराभूत झाली. ज्यामुळे महिला डबल्समधील पहिल्या फेरीतील सामना 6-0, 6-7(0), 8-10 च्या फरकाने भारताच्या हातातून गेला.

सिंधूची विजयी सुरुवात

इकडे भारताची एक स्टार महिला खेळाडू पहिल्या सामन्यातच पराभूत झाली असली तरी दुसरीकडे महिला बॅडमिंटनच्या एकेरीमध्ये पीव्ही सिंधूने (PV Sindhu) मात्र विजयाने टोक्यो ऑलिम्पिकची सुरुवात केली आहे. तिने ग्रुप J मध्ये महिला एकेरीच्या सामन्यात इस्रायलच्या खेळाडूला मात दिली. सिंधूने हा सामना 21-7, 21-10 च्या फरकाने सहज जिंकत विजय मिळवला. सिंधू आता महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(Indian Tennis Star Sania Mirza and Ankita Raina Lost in Womens doubles First Round at tokyo Olympics)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.