प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO

भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधलं पहिलं मेडल वेटलिफ्टर मीराबाई चानूने मिळवून देत नवा इतिहास रचला आहे.

प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO
मीराबाई चानूची फॅमिली आणि शेजारी
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 5:08 PM

Tokyo Olympics 20-2021 : बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympic) आज दुसराच दिवस असून भारताने आपलं पहिलं पदक ही पटकावलं आहे. भारतातील मणिपूरची रहिवाशी असणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu)  वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at tokyo) मिळवून दिलं आहे. दरम्यान मीराबाईने पदक पटकावताच तिच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे होते. ANI वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये चानूच्या घरातले आणि शेजारची मंडळी ती जिंकल्यानंतर जल्लोष करताना दिसत आहेत.

मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे.

पंतप्रधान मोदींनी ही दिल्या शुभेच्छा

मीराबाई चानूने हे रौप्य पदक पटकावत ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं  पदक मिळवून दिलं. याआधी  2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौैतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पद्मश्री मीराबाई चानू

26 वर्षीय मीराबाई ही मूळची मनिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असं आहे. ती भारताची आघाडीची महिला वेट लिफ्टर आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(Indian weightlifter Chanu Saikhom Mirabai finishes in second place Won Silver medal her family reation was awsome)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.