Tokyo Olympics 2021: महिला हॉकी टीमच्या पदकाच्या आशा अजूनही कायम, अर्जेंटीनाकडून पराभव, आता लढाई इंग्लंडशी
ऐतिहासिक कामगिरी करत इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ सेमीफायनलच्या सामन्यात महिला संघालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय महिलांचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. भारतीय महिलांना अर्जेंटीना संघाने 2-1 ने मात देत विजय मिळवला आहे.
महिला हॉकी संघाने 1980 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर थेट 36 वर्षांनी 2016 मध्ये भारतीय महिला रियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या. त्याठिकाणी एकही सामना महिलांना जिंकता आला नव्हता. यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये देखील भारतीय महिलांची सुरुवात परभवांनी झाली. पण ग्रुप स्टेजमधील अखेरचे दोन सामने जिंकत भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. पण अर्जेंटीनासमोर निभाव लागू न शकल्याने भारतीय महिलांचे सुवर्णपदकाचे स्वप्न तुटले आहे.
A spirited performance from the Indian Women’s Team but we go down fighting against Argentina. ?#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/PsJZhyjwnQ
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
असा झाला सामना
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीलाच गोल करत आघाडी मिळवली होती. स्टार खेळाडू गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने दुसऱ्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली पण दुसऱ्या क्वॉर्टरच्या 18 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या कीनोएल बेरिनुएवोने गोल करत सामन्यात 1-1 ची बरोबरी साधली. ज्यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये पुन्हा बेरिनुएवोने 36 व्या मिनिटाला गोल करत 2-1 ची विजयी आघाडी घेतली. ज्यानंतर भारतीय महिलांनी बरीच आक्रमणं केली. जी अर्जेंटीनाने परतवून लावली आणि अखेर भारतीय महिला 2-1 ने पराभूत झाल्या.
हे ही वाचा
Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा
Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव
(Indian Women Lost against Argentina team with 2-1 score in tokyo olympic semifinal )