Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई
भारतीय पैलवान रवी दहियाने अप्रतिम कामगिरी करत कुस्तीच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतली होती. पण अखेरच्या सामन्यात रशियाच्या जावूर युगुयेवने त्याला पराभूत केल्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.
Tokyo Olympics 20-2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं आहे. रवीचा थोडक्यात पराभव झाला असून दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदक मारलं आहे. पण रवीच्या या पदकासोबतच भारताची यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदक संख्या 5 झाली आहे.
भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. रवीने सेमीफायनलमध्ये कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामला मात देत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं होतं. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारताचा सुवर्णपदक नक्कीच मिळवून देईल असे वाटत होते. त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. अगदी चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर वेळेची मर्यादा असल्चाने रवी 3 गुणांनी कमी पडला आणि 7-4 ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं
What a day today for ??
Silver Medal now at the #Olympics
Ravi Kumar Dahiya bags Silver medal in #Wrestling#Tokyo2020 #Cheer4India pic.twitter.com/4O08pqCxeH
— ALL INDIA RADIO आकाशवाणी (@AkashvaniAIR) August 5, 2021
भारताच्या खिशात पाच पदकं
यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी चांगली ठरत आहे. भारताने आतापर्यंत 5 पदकं मिळवली असून आणखी काही भारताचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पाच पैकी दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं आहेत. यात सर्वांत आधी वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौैप्यपदक, त्यानंतर पीव्ही सिंधूने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. ज्यानंतर बुधवारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य तर आज सकाळी हॉकी पुरुष संघाने कांस्य पदक मिळवून देत भारतासाठी पदकांचा चौकार मारला. ज्यानंतर आता रवी दहियाने रौप्य पदक जिंकत पदकांची संख्या पाच केली.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय