Tokyo Paralympics 2020: भारताची यशस्वी कामगिरी सुरुच, बॅडमिंटनपटू सुहास यथिराजचे रौप्य पदक निश्चित, सुवर्णपदकाची आशा

सुहास यथिराज यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात अप्रतिम झुंज देत सामना जिंकला. त्यांनी इंडोनेशियाच्या शटलरला सरळ दोन सेट्समध्ये नमवत सामना जिंकला.

Tokyo Paralympics 2020: भारताची यशस्वी कामगिरी सुरुच, बॅडमिंटनपटू सुहास यथिराजचे रौप्य पदक निश्चित, सुवर्णपदकाची आशा
सुहास यथिराज
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 2:59 PM

Tokyo Paralympics : भारतीय पॅराएथलिट्सने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. नुकताच भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) एक पदक निश्चित केलं. भारताचं हे दुसरं पदक आहे. प्रमोद भगतनंतर आता भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता रौैप्य पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकाची आशाही निर्माण झाली आहे.

सुहास यथिराज हे पॅराएथलीट असण्यासोबतच नोएडाचे DM देखील आहेत. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय मिळवत पुढील फेरी गाठली. सुहास यांनी इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट  21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण या पदकाला सुवर्णपदकात बदलण्याची सुवर्णसंधी सुहास यांना रविवारी असेल.

तरूण ढिल्लन पराभूत

भारताचा अजून एक पॅरा बॅडमिंटनपटू तरूण ढिल्लन सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याच फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न तुटलं. त्याला लुकास मजूरने तीन सेट्स चाललेल्या सामन्यात मात दिली.  तरूण ढिल्लनने हा सामना 16-21, 21-16, 18-21 अशा तीन सेट्ममध्ये गमावला. या पराभवामुळे त्याची रौप्य पदकासह, सुवर्णपदकाची आशा संपली आहे. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या कांस्य पदकाची आशा अजूनही कायम असून तो यासाठी सामना खेळणार आहे.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(Indians parabadminton plauyer suhas yathiraj Dm of noida enter in mens singles final secures medal)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.