Tokyo Paralympics 2020: स्टार पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांना रौप्य पदक, चुरशीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक थोडक्यात हुकलं

सुहास यथिराज यांना पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण फायनलपर्यंत पोहोचल्याने सुहास यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Tokyo Paralympics 2020: स्टार पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज यांना रौप्य पदक, चुरशीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक थोडक्यात हुकलं
सुहास यथिराज
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 11:27 AM

Tokyo Paralympics : भारताचे पॅराबॅडमिंटनपटू तसेत नोएडाचे जिल्हाधिकारी असणाऱ्या सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. 38 वर्षीय सुहास यांनी दमदार कामगिरी करत अंतिम सामन्या पर्यंत धडक घेतली होती. पण फायनलमध्ये फ्रान्सच्या लुकास मजूर याने त्यांना मात दिल्याने सुवर्णपदकाजागी सुहास यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

फ्रान्सचा लुकास आधीपासूनच स्पर्धेत सुवर्णपदकाचा तगडा दावेदार मानला जात होता. याचे कारण त्याने याआधी देखील सुहास यांना पराभूत केलं होतं. पण अंतिम सामना मात्र अगदी अटीतटीचा झाला.  तीन सेट्समध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी चुरशीची टक्कर दिली. पहिला सेट सुहास यांनी 21-15 च्या फरकाने जिंकला. ज्यामुळे सामन्यात त्यांनी 1-0 ची आघाडी घेतली. पण नंतर लुकासने पुनरागमन करत दुसरा सेट  21-17 ने तर तिसरा सेट 21-15 ने जिंकत सामन्यात विजय मिळवला. या विजयासह लुकासने सुवर्णपदक पटकावलं आणि सुहास यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

कृष्णा नागरला सुवर्णपदक

सुहास यथिराज सुवर्णपदक मिळवण्यात यशस्वी राहिले असले तरी त्यांच्या सामन्यानंतर काही तासांत झालेल्या सामन्याक पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने (Krishna Nagar) सुवर्णपदक मिळवत भारताची पदक संख्या थेट 19 वर पोहोचलवली. अंतिम सामन्यात SH6 स्पर्धेत हाँगकाँगच्या चू मॅन कई याला  मात देत कृष्णाने सुवर्णपदक खिशात घातलं. कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला.  पहिला सेट 14 मिनिटांमध्ये कृष्णाने 21-17 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कई याने पुनरागमन करत 21-16 च्या फरकाने सेट आपल्या नावे केला. पण अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र कृष्णाने कोणतीच चूकी न करता 15 मिनिटांमध्ये सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच कृष्णाने सुवर्णपदक जिंकला. विजयानंतर कृष्णाचा आनंद पाहण्याजोगा होता.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: भारतासाठी सुवर्णमय सकाळ, बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक, भारताचं स्पर्धेतील 19 वं पदक

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(Indians parabadminton player suhas yathiraj Dm of noida Won Silver medal at tokyo paralympics 2020)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.